Goa Diary: एकेकाळी फेणीसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव आज बनलंय पर्यटकांचं केंद्र, कोरोनानंतर हा बदल कसा घडला?

Ashvem Beach Goa: या गावात राहणाऱ्या अनेकांचा फेणीचा व्यवसाय होता, या गावातील समुद्रकिनारा गोव्यातील शांत समुद्रांपैकी एक होता मात्र आता या गावाचा नकाशा बदलालाय..
Ashvem Beach Goa: या गावात राहणाऱ्या अनेकांचा फेणीचा व्यवसाय होता, या गावातील समुद्रकिनारा गोव्यातील शांत समुद्रांपैकी एक होता मात्र आता या गावाचा नकाशा बदलालाय..
Ashvem Beach GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मुळातच उत्तर गोवा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, मात्र जर का आम्ही असं सांगितलं कि उत्तर गोव्यात असं एक गाव आहे जे काही वर्षांपूर्वी फक्त फेणीच्या व्यवसायासाठी ओळखलं जायचं तर तुमचा विश्वास बसेल का? या गावात राहणाऱ्या अनेकांचा फेणीचा व्यवसाय होता. अगदीच मागच्या दोन वर्षांपूर्वी या गावातील समुद्रकिनारा गोव्यातील शांत समुद्रांपैकी एक होता आज वाढत्या पर्यटनामुळे या गावाचं चित्रंच बदलून गेलंय. मांद्रे येथील आश्वे या गावचं नाव ऐकलंय का? तर याच गावांत काही वर्षांपूर्वी शांतता पसरलेली असायची आणि आज या गावचं पूर्ण चित्र बदलून गेलंय. का? आणि कसं? जाणून घेऊया...

तर काजू फेणीवर जगणाऱ्या आश्वे या गावाने पर्यटकांसाठी दरवाजे खुले आणि हळूहळू गाव बदलायला सुरुवात झाली. आज याच गावात समुद्र किनाऱ्याच्या बाजूला केवळ २०० मीटरच्या अंतरावर चार भली मोठी रेस्टोरंट्स उभी आहेत. गाव छोटं असलं तरीही आश्व्यात दोन मोठी दारूची दुकानं आहेत, त्यामुळे गावामधल्या छोट्याश्या रस्त्यांवरून जाताना अनेकदा ट्राफिकचा थोडासा त्रास जाणवतो. आश्व्यातील समुद्रकिनारा काही वर्षांपूर्वी बराच शांत आणि कमी रहदारी असलेला होता मात्र आता या गावाचा नकाशा एवढा बदलालाय की आजच्या घडीला या समुद्रकिनाऱ्यावर गर्दी वाढताच ट्राफिक आणि पार्किंगमुळे प्रचंड वैताग निर्माण होतो.

Ashvem Beach Goa: या गावात राहणाऱ्या अनेकांचा फेणीचा व्यवसाय होता, या गावातील समुद्रकिनारा गोव्यातील शांत समुद्रांपैकी एक होता मात्र आता या गावाचा नकाशा बदलालाय..
Calangute Crime: 'नाईट लाईफ' नव्हे ही तर वाईट लाईफ! कळंगूटची प्रतिमा मलीन का होतेय?

कोविडच्या काळात या गावात अनेक भारतीय पर्यटक येऊन राहायचे, आज अनेक बड्या लोकांनी याच जागेत घरं विकत घेतली आहेत. स्थनिक सांगतात की त्यांनी घरातील काही खोल्या भाड्याने देऊ केल्यात. जिथे अनेक भारतीय कामासाठी येऊन राहतात किंवा काहीजणं आजूबाजूला असलेल्या हॉटेल्समध्ये काम करतात. इथल्या रेस्टॉरंट्समध्ये इंडो-कॉन्टिनेन्टल पदार्थ भरपूर मिळतात. एकवेळ या हॉटेल्समध्ये गोव्यातील जेवण मिळणार नाही पण कॉन्टिनेन्टल जेवणाला कोणी नाही म्हणू शकणार नाही. याच गावातील एका हॉटेलचा मॅनेजर सांगतो की लोकांना हॉटेलजवळ आणण्यासाठी आम्हाला काही विशेष करावं लागत नाही. आम्ही पर्यटकांची गरज माहिती आहे, आम्ही काय ऑफर करतो हे ते जाणतात, आणि स्वतःहून आमच्या हॉटेलजवळ येतात.

आश्व्यातील समुद्र किनाऱ्यावरच्या रात्रीचं गणित सुद्धा बऱ्यापैकी बदललं आहे. जिथे अनेकवेळा केवळ टू व्हीलर यायच्या याच त्याच ठिकाणी श्रीमंत लोकांच्या मोठाल्या गाड्या पाहायला मिळतात. आजकाल अनेक पर्यटकांची पावलं या गावाजवळ वळली आहेत, हे पर्यटक अशा गावांमध्ये महिन्याभरासाठी रहातात पण त्यांच्या असण्यामुळे स्थानिकांना त्रास होत नाही कारण अनेकवेळा या पर्यटनाचं आयुष्य रात्री सुरु होतं आणि गावातील लोकं तेव्हा साखर झोपेत असतात.

आश्व्याचा समुद्र किनारा बऱ्यापैकी शांत आहे, इथे मोठमोठ्या लाटांचा प्रवाह नसतो आणि म्हणूनच लहान मुलं अगदी सहजपणे इथे खेळू बागडू शकतात. आश्व्याचा हा किनारा खरोखर एका परिवाराने भेट द्यावा असाच आहे.

यावरून काय समजलात, ज्या गावात काही वर्षांपूर्वी काजूच्या फेणीवर जीवन जगलं जायचं आज त्याच गावाचा प्रमुख व्यवसाय पर्यटन बनलाय. गावातील तरुण पोरं कामासाठी बाहेर गावी चालली आहेत मग अशावेळी आश्व्यातील रहिवाश्यांचा व्यवसाय कायमचा बदलला की काय असा प्रश्न पडतो...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com