Goa: Students and Parents at Azad Maidan Panaji
Goa: Students and Parents at Azad Maidan Panaji Dainik Gomantak

'ऑफलाइन' पद्धतीने वर्ग घेण्याची राज्यातील पालक व विद्यार्थ्यांची मागणी

मोबाईलवरून ऑनलाईन वर्ग घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांची मागणी
Published on

Panaji: राज्यातील सर्व शाळांचे (Goa Schools) वर्ग व परीक्षा ऑफलाईन (Offline Classes) पद्धतीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आज पणजीत विविध हायस्कूलच्या विद्यार्थी व पालकांनी फेरी काढली. सरकारने राज्यातील (Goa Govt) सर्व व्यवहार सुरू केले मात्र कोरोनाच्या भीतीपोटी शाळा सुरू केल्या नाहीत. ऑनलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक तसेच शारीरिक समस्यांना (Mental and Physical Problems) सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे त्वरित ऑफलाईन पद्धतीने वर्ग सुरू करावे, अशी मागणी (Demand from Student and Parents) यावेळी करण्यात आली.

Goa: Students and Parents at Azad Maidan Panaji
झेंडूच्या फुलांनी बहरला बाजार

गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या मात्र संसर्गाचे हे प्रमाण आटोक्यात आले असतानाही तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी सरकार निर्णय घेत नाही. मोबाईलवरून ऑनलाईन वर्गामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. वारंवार मोबाईलच्या स्किनकडे पाहत राहावे लागत असल्याने काहींच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षक शिकवत असले तरी विद्यार्थ्यांना विषय समजण्यापलिकडे जात आहे. त्यामुळे ही पद्धत बंद करून कोरोना मार्गदर्शक तत्वांचे अवलंबून करून सरकारने शाळा पूर्ववत सुरू करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांसह उपस्थित असलेल्या पालकांनी केली.

Goa: Students and Parents at Azad Maidan Panaji
अमित शहांच्या दौर्‍यामुळे गोव्यातील खड्डे दुरुस्तीला लागला मुहूर्त

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा तसेच वर्ग घेऊन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक विद्यार्थ्यी अभ्यास न करताच पुस्तके घेऊन परीक्षा देतात. मात्र त्याचा परिणाम त्यांच्या पुढील भवितव्यावर होणार आहे. शाळा वगळता इतर सर्व घटक क्षेत्र सुरू झाले आहेत तर शाळांनाच कोरोनाची भिती दाखवून का बंद ठेवल्या जात आहेत असा प्रश्‍न काही पालकांनी केला. सरकारने घेतलेले हे निर्णय आता सहनशीलतेच्या बाहेर जात आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करण्याची गरज आहे. शाळांच्या व्यवस्थापनांनी कोरोना मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून शाळांचे वर्ग व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे असे मत पालकांनी व्यक्त केले.

Goa: Students and Parents at Azad Maidan Panaji
बहुजन समाजविरोधी भाजप सरकार;गिरीश चोडणकर

यापूर्वीही जगात तसेच देशात मोठी संकटे आली मात्र त्यामुळे कोणी कायम घरात बसले नाहीत. आता कोरोना संकट कमी होत आले आहे तर शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू न करण्यास काय अडचणी आहेत? असा सवाल विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी केला. सर्वांनी या संकटाविरुद्ध लढा देण्याची तयारी ठेवली पाहिजे. शाळाचे वर्ग पूर्ववत सुरू हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा दृष्टीने महत्वाचे आहे. या शाळा सुरू करण्याचा विचार शिक्षक व पालक करतील त्यामध्ये कोणी राजकारण्यांनी हस्तक्षेप करू नये संतप्त मत एका पालकाने व्यक्त केले.

Goa: Students and Parents at Azad Maidan Panaji
युतीबाबत काय ते ठरवा, अन्यथा माझा निर्णय घेईन!

ऑनलाईन पद्धत काही विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर असली तरी विद्यार्थी हे स्वतःचेच नुकसान करून घेत आहेत. या पद्धतीमुळे अभ्यास न करताच कॉपी करून परीक्षा देता येतात व गुणही भरपूर मिळतात मात्र स्वतःच स्वतःला फसवत आहोत. ज्यावेळी प्रवेश परीक्षेसाठी सामोरे जावे लागेल तेव्हा विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की ऑनलाईन पद्धतीमुळे किती नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोरोना संकटाला न घाबरता सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करून ऑफलाईन पद्धतीला पाठिंबा देण्याचे आवाहन एका विद्यार्थ्याने केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com