Goa: सोनसोडा कचरा प्रश्र्नी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी

मडागवचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांना या संबंधी संपुर्ण व पुरेपुर माहिती असुन त्यानाच हा प्रश्र्न प्रामाणिकपणे सोडविणे शक्य असल्याचे नाईक म्हणाले.
Sonsoda
SonsodaDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: मडगाव (Madgaon) येथील सोनसोडा कचरा प्रश्र्न दिवसे दिवस जटील व बिकट होत चालला असुन हा प्रश्र्न सोडविण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना आवश्यक असल्याचे समाजसेवक व उद्योजक विवेक के. नाईक यांनी म्हटले आहे.

मडागवचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांना या संबंधी संपुर्ण व पुरेपुर माहिती असुन त्यानाच हा प्रश्र्न प्रामाणिकपणे सोडविणे शक्य असल्याचे नाईक म्हणाले. केवळ येथे कचरा आणुन टाकला जातो व कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. मुंबई व इतर शहरांमध्ये भर वस्तीत सुद्धा कचरा ट्रिटमेंट प्लांट आहेत. तशाच प्रकारचे प्लांट मडगाव शहरात अनेक ठिकाणी असणे गरजेचे असल्याचेही नाईक म्हणाले. सोनसोडा कचऱ्यातुन दुर्गंधी चार ते पाच किलोमीटर परिसरात पसरते व त्याचे नागरिकांना त्रास होतात या कडे त्याने लक्ष वेधले.

Sonsoda
गोवा मुक्त होवून 60 वर्षे झाली; हणखणेतील गावकरी रस्त्याच्या प्रतिक्षेत

नगरसेवक कामिलो बार्रेटो म्हणाले की सोनसोडा प्रश्र्नी नगरपालिकेचा केवळ दिखावुपणा चालु आहे. हल्लीच बीपीएस क्लबमध्ये झालेल्या पावर पॉईंट प्रेझेंटेशनच्या वेळी आपण जी यंत्रणा बिघडलेली आहे ती दुरुस्त करण्यास सर्वप्रथम प्राधान्य द्यावे असे सुचविले होते असेही बार्रेटो यांनी सांगितले. नगरपालिकेच्या बैठकीत मी हा प्रश्र्न उपस्थित करणार असल्याचेही बार्रेटो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com