Goa News : बांगड्यांना मागणी, मात्र ‘कासारां’ची संख्या घटली

Goa News : उसगावातील गोकुळदास एकावडे ४० वर्षांपासून करतात पारंपरिक व्यवसाय
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

तांबडीसुर्ला, पूर्वीच्या काळी प्रवासाची कोणतेही सोय नसल्याने व्यावसायिक गावात चालत जाऊन आपला पारंपरिक व्यवसाय प्रामाणिकपणे करत होते. व्यवसायात फायदा, तोटा याचे मोजमाप ते कधीही करत नव्हते.

आपला पारंपरिक व्यवसाय टिकून राहण्यासाठी ते प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते. गोकुळदास एकावडे हे त्यापैकी एक बांगड्या विकणारे (कासार) व्यावसायिक आहेत.

कुडणे-साखळी येथील गोकुळदास एकावडे हे व्यवसायानिमित्त तिस्क-उसगाव येथे स्थायिक झाले आहेत. गेली ४० वर्षे ते बांगड्या विकण्याचा व्यवसाय करत आहे. तिस्क बाजार, जत्रा अथवा गिऱ्हाईकांच्या मागणीनुसार बांगड्यांची विक्री करतात.

काळ कितीही बदलला तरी बांगड्यांना अजूनही मागणी कायम आहे, असे ते सांगतात.

आग्रा-दिल्ली येथे या बांगड्यांचा कारखाना आहे. येथून सर्व राज्यात बांगड्यांचा पुरवठा होत असतो. मडगाव, फोंडा येथेही बांगड्यांची दुकाने असल्याने व्यवसायिकांची सोय झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पूर्वी बांगड्या काचेच्या, प्लास्टिक वा अल्युमिनियमच्या असायच्या. आता केवळ काचेच्या, ब्रास व क्वचितच प्लास्टिकच्या बांगड्या उपलब्ध असतात.

Goa
Goa Crime News: पर्वरीत आयपीएलवर बेटिंग, गुजरात, युपीच्या 16 जणांना अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

या बांगड्यांना मागणी जास्त

बांगड्या १ ते ७ नंबरच्या आकाराच्या असून साधारणपणे ३ ते ५ नंबरच्या बांगड्यांना जास्त मागणी असते .ज्यावेळी ते बांगड्या विक्रीच्या व्यवसायात आले त्यावेळी बांगड्या केवळ ६ रुपये डझन होते.

सध्या काचेच्या १०० रुपये तर ब्रासच्या बांगड्या ६० रुपये प्रति डझन दराने विक्री होत आहे. या बांगड्यांची गुणवत्ता दीर्घकाळ टिकत असल्याने त्याला खूपच मागणी असते. व्यवसायात कधीकधी काचेच्या बांगड्यांची मोडतोड होत असते.त्यामुळे या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता असते.

वधूसाठी हिरवा चुडा

ऑक्टोबर ते मे महिनापर्यंत धंदा साधारणपणे चालतो. पावसाळ्यात गिऱ्हाईक खूपच कमी असते. तथापि श्रावण महिना हा सणांचा राजा असल्याने या महिन्यात व्यवसायाला चांगले दिवस येतात. लग्नाच्या मोसमात वधूला हिरवा चुड्याला घालण्यासाठी आगाऊ नोंदणी केली जाते.

लग्न सोहळ्यात वधूला कितीही सोन्याच्या दागिन्यांनी सजविले तरी देखिल हळदी समारंभात वधूला हिरव्या चुडा घालणे ही परंपरा आहे. ग्रामीण भागात अजूनही प्रथा चालू आहे. प्रत्येक वर्षी लग्न मोसमात १५-२० वधूला हिरवा चुडा घालण्यासाठी वधूच्या घरी जावे लागते, असे एकावडे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com