Panaji News : निकृष्ट दर्जाच्या काजू विक्रीमुळे गोव्याची बदनामी : विंदेश शिरोडकर

Panaji News : ‘गोव्यातील काजू प्रक्रिया उद्योगाचे पुनर्जीवन’ चर्चासत्रात मार्गदर्शन
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, गोव्यात सर्रासपणे बाहेरून आणलेले काजू गोव्यातील काजू म्हणून विकले जातात. अशा काजूमध्ये गुणवत्ता नसते. ज्यावेळी पर्यटक, ग्राहक ते काजू खरेदी करून घेऊन जातात त्यावेळी ते खराब निघतात.

अशा निकृष्ट दर्जाच्या काजूंमुळे गोव्याची बदनामी होते. यावर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे कॅश्‍यू ट्रिजचे विंदेश शिरोडकर यांनी सांगितले.

काजू महोत्सवांतर्गत कला अकादमी येथे आयोजित ‘गोव्यातील काजू प्रक्रिया उद्योगाचे पुनर्जीवन’ याविषयावरील चर्चासत्रात शिरोडकर बोलत होते. या चर्चासत्रात झांट्ये कॅश्‍यूजचे सिद्धार्थ झांट्ये, भारतीय उद्यम विकास संस्थेचे प्रा. डॉ. अब्दुल रझाक, उद्योग उपसंचालक ओमकार आसोलकर, शांतादुर्गा काजू उद्योगचे वैभव सावईकर यांनी सहभाग घेतला होता.

शिरोडकर म्हणाले, गोव्यात बाहेरील काजू गुणवत्तापूर्ण गोमंतकीय काजूंच्या तुलनेत स्वस्त दरात विकले जातात, त्यामुळे गोव्यातील काजू प्रक्रिया व्यावसायिक गोव्यात काजू विक्री करण्याव्यतरिक्त मुंबईत करत आहेत.

काजूला जीआय टॅग आहे; परंतु गोव्यातील काजू विक्रीवर सरकारचे लक्ष असणे गरजेचे आहे. आपल्या शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काजू प्रक्रिया उद्योग निर्मिती होत असून आमच्या तुलनेत तेथे कामगार तसेच कच्चा मालाची किंमतही कमी आहे, त्यामुळे सरकारच्या साहाय्याची गरज आहे.

पूर्वी अमेरिकेत सर्वाधिक काजूचे सेवन व्हायचे; पंरतु आता भारतातदेखील काजू तसेच इतर सुकामेवा खाण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यांचे मार्केटिंग मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. काजू आरोग्याच्या अनुषंगाने कसा महत्त्वाचा आहे, हे नागरिकांपर्यंत पोहोचविल्यास काजू उद्योगाला अधिक गती देता येईल, असे सिद्धार्थ झांट्ये यांनी सांगितले.

Panaji
Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

योजना राबविणे गरजेचे

गोव्यातील काजूचे उत्पादन दोन ते तीन महिने येते. कच्चा माल विकत घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. तो कच्चा माल मिळवून योग्यप्रकारे साठवावा लागतो. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. याबाबत राज्य सरकारने गोव्यातील काजू प्रकिया उद्योजकांसाठी काही योजना राबविणे गरजेचे असल्याचे वैभव सावईकर यांनी सांगितले.

राज्य सरकारच्यावतीने लहान तसेच मध्यम उद्योजकांसाठी अनेक योजना राबविल्या जात असून काजू प्रक्रिया व्यावसायिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओमकार आसोलकर त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com