दीपावलीच्या दिवशी मये गांव अंधारमय

गेल्या महिन्याभरापासून मये गावात सुरू आहे विजेचा लपंडाव
प्रतीकात्मक छायाचित्र
प्रतीकात्मक छायाचित्र Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: भर दीपावलीच्या दिवशी मये गांव (Mayem Village) अंधारमय (Dark) होऊन राहिला. त्यामुळे मयेवासियामध्ये संतापाची लाट पसरली आहे. डिचोली वीज विभागाच्या (Bicholim Electricity Department)सहायक अभियंत्यांना फोनद्वारे विचारल्यास ओव्हर लोड, झाडे, फांद्या पडतात असे कारण सांगण्यात आले.

प्रतीकात्मक छायाचित्र
संपूर्ण क्रांतीच भाजपचा पराभव करेल: सरदेसाई

परंतु मये गावी गेला महिनाभर विजेचा लपंडाव चालूच असून दिवसा तसेच रात्री विजेचा बंद करण्यात येतो. वीजमंत्री निलेश काब्राल यांनी याबाबत वीज अधिकाऱ्यांशी बोलून या समस्येचा सोक्षमोक्ष लावावा.

काही दिवसापुर्वी येथील समाज कार्यकर्ते संतोषकुमार सावंत यांनी डिचोलीच्या वीज कार्यालयात मोर्चा नेऊन वीज अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. दहा पंधरा दिवसात प्रश्न सोडविला जाईल असे त्यांनी आश्वासनही दिले होते. परंतु पावसाळा संपला तरी अजुनही फांद्या, झाडे आणि ओव्हरलोडची सबब सांगितली जाते, हे संतापजनक होय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Viral Infection Cases
Girish Chodankar X post
Goa Ganesh Immersion Safety 2026
Porvorim Elevated Road Two Wheeler Ban
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com