Goa: दामोदर सप्ताह यावर्षीही शांततेत साजरा केला जाणार

महामारीमुळे देवाला (Damodar devstan Vasco) सुद्धा बंदीस्त व्हावे लागले (Vasco - Goa)
Damodar Mandir Samiti with Mandir Pujari, Goa
Damodar Mandir Samiti with Mandir Pujari, GoaPradip Naik / Dainik Gomantak
Published on
Updated on

यंदाचा वास्कोतील (Vasco) प्रसिद्ध श्री दामोदर सप्ताह (Damodar Saptah) निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी प्रार्थना करत वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताह (Damodar Saptah, Vasco) समितीतर्फे जांबावली (Jambavali) येथे जाऊन श्री दामोदर (Damodar Devsthan) चरणी श्रीफळ अर्पण केले. तसेच सर्वांची कोविड महामारीपासून (Covide epidemic) सुटका करून सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्याची मागणी श्री चरणी करण्यात आली. यंदाचे श्री दामोदर भजनी सप्ताह चे १२२ वे वर्ष असून वास्को सप्ताह सुरू केल्यापासून ते आजपर्यंत वास्कोतील श्री दामोदर भजनी उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम जांबावली येथे जाऊन श्री दामोदर चरणी श्रीफळ अर्पण करून वास्को सप्ताह उत्सवाची तयारी सुरु करतात. कारण १२१ वर्षापूर्वी वास्को मध्ये प्लेगची महामारी आली होती. महामारी पसरत गेल्याने पोर्तुगीजांनी त्या वेळी शहरातील ख्रिश्चनांचे इतर ठिकाणी स्थलांतर केले होते. यावेळी राहिलेले हिंदू एकत्र आले व चर्चा करून सुमारे दहा ते बारा जणांनी जांबावलीला जाण्याचा निर्णय घेतला. जांबावलीला एका व्यक्तीच्या अंगामध्ये अवसार येत होता. त्यावेळी त्या व्यक्तीने वास्कोच्या मंडळींना कौलाच्या रूपाने श्रीफळ देऊन वास्कोमध्ये दाखल झाल्यानंतर श्री फळाची पूजा व गावाची स्वच्छता करण्यास सांगण्यात आले. मंडळी श्रीफळ घेऊन चालत वास्कोमध्ये आले.

Shri Damodar Sansthan Samiti, Jambhavali, Vasco - Goa.
Shri Damodar Sansthan Samiti, Jambhavali, Vasco - Goa.Pradip Naik / Dainik Gomantak

सर्व मंडळी नागपंचमीच्या दिवशी रात्री १२.३० वाजता शहरात दाखल झाले. सर्वांनी एकत्र येऊन श्रीफळची स्थापना येथील स्वर्गीय सुब्राय जोशी यांच्या घरातील 'सालात' ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीफळाची पूजाअर्चा करून प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. त्याच बरोबर शहरातील हिंदू बांधवांनी स्वच्छता करण्यास सुरुवात केली आणि कालांतराने प्लेग महामारीमारीवर मात करण्यात यश मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत श्री दामोदर उत्सवाची सुरुवात जांबावली येथील श्री दामोदर चरणी ठेवून तसेच तेथून श्रीफळ आणून केली जाते. दरम्यान आज शनिवारी २४ रोजी श्री दामोदर भजनी सप्ताह समितीचे अध्यक्ष श्री जगदीश शेट दुर्भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव समितीचे विष्णू गारोडी, संतोष खोर्जूवेकर, शैलेश गोवेकर, शेखर खडपकर, भरत कोलगावकर, प्रकाश गावस, हेमंत फडते, नंदादीप राऊत, दामोदर कोचरेकर, दीपक नार्वेकर,नरेश नाईक,अजय परब, दाजी साळकर, आदी समिती सदस्यांनी जांबावली येथे श्री चरणी श्रीफळ अर्पण करून गाऱ्हाणे घातले व श्रीफळ वास्कोत आणून ते दामोदर चरणी ठेवले. कोरोना महामारी लवकर आटोक्यात आणा अशी श्रीचरणी यावेळी प्रार्थना करण्यात आली.

Damodar Mandir Samiti with Mandir Pujari, Goa
Goa Floods: म्हादईचा कहर, प्रसिद्द शांतादुर्गा देवस्थान पाण्याखाली

दरम्यान गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही श्री दामोदर भजनी सप्ताह सार्वजनिकरीत्या साजरा करण्यासाठी बगल देण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदाही सप्ताहानिमित्त शहरात लागणारी फेरी दिसणार नाही. तसेच मंदिरात येणारे पारही दिसणार नाही. त्यामुळे दिंड्या मृदंगाचे स्वर कानी पडणार नाही. रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या गायनाच्या मैफली होणार नाही. शहरात रोषणाई होणार नाही. सर्वत्र सामसूम असेल. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही श्री चरणी श्रीफळ ठेवून, गार्‍हाणे घालून, हात जोडून प्रार्थना करून नंतर टाळांच्या मृदुंगाच्या स्वरातून सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. मात्र कोरोना महामारीमूळे भाविकांना मंदिरात आत मध्ये प्रवेश मिळणार नाही. कारण पुन्हा १२१ वर्षानंतर नवीन महामारीचे संकट उभे राहिले आहे. १२१ वर्षांपूर्वी संकट मर्यादित क्षेत्रामध्ये होते. तर आजचे संकट संपूर्ण जगाला वेढून बसलेले आहे. त्यामुळे देवाला सुद्धा बंदीस्त व्हावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com