‘गोवा डेअरी’ची निवडणूक रंगणार

38 जण रिंगणात : उमेदवारांना निवडणूक चिन्ह बहाल
Goa Dairy Election
Goa Dairy ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : गोवा डेअरीची 12 संचालक मंडळासाठी येत्या 19 रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एकूण 38 उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत. निवडणुकीसाठी एकूण 43 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, पण त्यातील पाच उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने सध्या 38 जण निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. निवडणूक अधिकारी राजू मगदूम यांनी या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह बहाल केल्याने खऱ्या अर्थाने आता प्रचाराला सुरवात झाली आहे.(Goa Dairy Election News)

उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज मागे घेतला गेला नाही, त्यामुळे तीन पॅनलमधील एकूण 38 जण उमेदवारांपैकी बारा उमेदवारांना निवडून आणावे लागणार आहे. उमेदवारी दाखल केलेल्यात नवसू आरोलकर, चंद्रकांत भाटीकर, अजय देसाई, अनुप देसाई, भागिरथी देसाई, धनंजय देसाई, संदीप देसाई, बाबूराव फट्टो देसाई, विठोबा देसाई, सुधीर धाऊस्कर, दयानंद फळदेसाई, राजेश फळदेसाई, रवींद्र फळदेसाई, बाबू फालो, मंगेश फर्नांडिस, आसेल्मो फुर्तादो, विजयकांत गावकर, प्रकाश जल्मी, नीलेश मळीक, गोविंद नाईक, श्रीकांत नाईक, आदिनाथ परब, गुरुदास परब, गुरुदास शांताराम परब, मदन परब, वैभव परब, संदेश पाटील, शिवानंद पेडणेकर, उदय प्रभू, विकास प्रभू, नितीन प्रभुगावकर, माधव सहकारी, दीपाजी सरदेसाई, ज्ञानेश्‍वर सावंत, दुर्गेश शिरोडकर, प्रमोद सिद्धये, उल्हास सिनारी व विश्‍वास सुखटणकर या उमेदवारांचा समावेश आहे.

Goa Dairy Election
राजधानी पणजीत बसेसची गती मंदावली

बिनविरोध होता होता...

गोवा डेअरीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वाटत असतानाच आता 38 जण निवडणूक रिंगणात शिल्लक उरले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोठे प्रयत्न केल्याची माहिती काही संचालकांनी दिली. बिनविरोध निवडीसाठी बहुतांश उमेदवार तयार झाले, मात्र काही उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने शेवटी अडतीस जणांत अर्थातच तीन पॅनलमध्ये ही निवडणूक होणार असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com