Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या 'अस्‍तित्‍वाची चिंता'

Dabolim Airport: आंतरराष्ट्रीय विमानांसाठी आता दाबोळी विमानतळाची गरज संपली आहे, हे अधोरेखित झाले आहे.
Dabolim AirPort
Dabolim AirPortDainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Airport: आंतरराष्ट्रीय विमानांसाठी आता दाबोळी विमानतळाची गरज संपली आहे, हे आज अधोरेखित झाले आहे. गोव्यात सर्वात जास्त विदेशी प्रवासी आणणाऱ्या ओमान एअरलाईन्सने 31 डिसेंबर रोजी दाबोळी विमानतळाला 'गुड बाय' करणार आहे.

1 जानेवारी 2023 पासून आपली सर्व विमाने ‘मोपा’वर उतरविण्याचा निर्णय ‘ओमान’ने जाहीर केला आहे. यामुळे दक्षिण गोव्यातील आदरातिथ्य व्यवसायातील अनेकांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच दाबोळी विमानतळ बंद होणार, या चर्चेने पुन्‍हा डोके वर काढले आहे.

Dabolim AirPort
Goa News: गोव्यात शैक्षणिक संस्थांना मिळणार सौर ऊर्जा प्रकल्प!

ओमान एअरलाईन्सने आपल्या प्रवाशांना पाठविलेल्या एका मेलमध्ये, 1 जानेवारीपासून कंपनीची सर्व विमाने मोपा आंतरराष्ट्रीय (जीओएक्स) विमानतळावर उतरणार आणि तेथूनच उड्डाण घेतील. गोवा आंतरराष्ट्रीय (दाबोळी जीओआय) विमानतळावरील सर्व ऑपरेशन्स बंद केली जाणार, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

या पार्श्‍वभूमीवर बाणावलीचे आमदार वेन्‍झी व्‍हिएगस यांनी ‘ओमान’चे मुख्य वाहतूक अधिकारी नासीर अल सलमी यांना निषेधाचा ईमेल पाठविला. त्यात हा निर्णय विमान कंपनी आणि प्रवासी या दोघांच्याही हिताचा नसल्याने त्वरित बदलावा, अशी मागणी केली आहे. आज संध्याकाळी व्‍हिएगस यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाविरोधात सर्व संबंधितांनी यावर आवाज उठवून कंपनीला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडावे, असे आवाहन केले.

Dabolim AirPort
Anjuna येथे 18 लाखाचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

व्यावसायिकांना भीती

‘दाबोळी’ला रामराम म्हणणारी ओमान एअर ही पहिली कंपनी ठरली आहे. या निर्णयाचा फटका दक्षिण गोव्यातील प्रवासी आणि आदरातिथ्य व्यावसायिकांना बसणार, अशा प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. हा प्रश्न फक्त हॉटेल्‍सचालक आणि टॅक्सीचालकांचा नाही आहे. इतर हजारो लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत असे सांगत अनेकांनी भाजप सरकारचे हे धोरण असून ते चुकीचे असल्याची टीका केली.

दोन्ही विमानतळांबाबत असेही मतप्रवाह

ओमान एअरची ही घोषणा म्हणजे दाबोळी बंद करण्याची नांदी, याच दृष्टिकोनातून दक्षिण गोव्यातील नागरिक व आदरातिथ्य व्यवसायातील लोक पाहत आहेत. ‘मोपा’ सुरू झाल्यावर ‘दाबोळी’ सुरू राहिल, असे म्हणणे म्हणजे निव्‍वळ दिशाभूल आहे, अशी टीका गोवा लहान आणि मध्यम हॉटेलियर्स संघटनेचे माजी अध्यक्ष सेराफीन कोता यांनी केली.

देश-विदेशात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दोन वेगवेगळे विमानतळ असले तरी त्या दोन्हींची धावपट्टी एकच आहे. दाबोळी आणि मोपा या दोन्हीमधील हवाई अंतर पुरेसे नसल्याने एकाच बरोबर हे दोन्ही विमानतळ चालणे अशक्य आहे. ते चालवायचेच असतील, त्यावेळी दुसरे विमानतळ बंद ठेवावे लागेल.

Dabolim AirPort
Anjuna येथे 18 लाखाचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

फा. एरेमीत रिबेलो, निमंत्रक गोवन्स फॉर दाबोळी ओन्ली-

मोपा सुरू झाल्यावर दाबोळी चालू राहणार याची कल्पनाही करणे मूर्खपणा आहे. कारण एकाच बरोबर दोन्ही विमानतळ चालणे आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे दाबोळी हळूहळू बंद होणार, हे सगळ्यांना माहिती आहे. दाबोळी बंद होईल, तो दिवस दक्षिण गोव्यातील पर्यटन व्यवसाय क्षेत्राच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा ठरणार आहे.

धनंजय राव, दाबोळी विमानतळ प्राधिकरण संचालक-

ओमान एअर 31 डिसेंबरपासून दाबोळीवरील आपले ऑपरेशन्स बंद करणार, याची अद्यापतरी अधिकृत सूचना आम्हाला कुणी दिलेली नाही. त्यामुळे या निर्णयावर मी काही भाष्य करू शकत नाही.

Dabolim AirPort
ZP Election: पराभवानंतर काँग्रेसची चिंतन बैठक; आलेमाव,पाटकर उपस्थित
  • दक्षिण गोव्यातील बरेच लोक आखातात काम करत असून ते बहुतांश ओमान एअरनेच गोव्यात येतात. या प्रवाशांना मोपावरून दक्षिण गोव्यात येणे म्हणजे दुप्पट भुर्दंड बसेल.

  • ‘मोपा’ पर्यटन केंद्रापासून दूर आहे. तिथे प्रवाशांना उतरविल्यास त्यांना पर्यटन केंद्राकडे येण्यास अधिक पैसे खर्च करावे लागतील. गोवेकरांनाही या निर्णयाचा त्रास होईल.

  • हा निर्णय खुद्द ‘ओमान’साठीही नुकसानीचा आहे. मुरगाव बंदरावर उतरविले जाणारे विमानाचे इंधन मोपापर्यंत नेण्यात खर्च वाढेल. त्यामुळे कंपनीचे अधिक पैसे खर्च होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com