Dabolim News: दाबोळीतील 'फनेल झोन'मधील घरांवर कारवाई सुरुच; चिखली सरपंचांचा MPDA सदस्यपदाचा राजीनामा

Dabolim News: परिसरात विमानांच्या लॅण्डीग वेळी एखादी घटना घडली तर मोठा हाहाकार माजेल यासाठीच या परिसरात घर बांधणे धोक्याचे असल्याचे जाहीर
Dabolim funnel zone
Dabolim funnel zone Dainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim News: सर्व यंत्रणंचे ना हरकत दाखले, परवाने असतानाही दाबोळी येथील फनेल झोनमधील काही घरांचे बांधकाम अशंतः पाडण्यात आल्याप्रकरणी चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी मुरगाव विकास व नियोजन प्राधिकरणाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. काल म्हणजेच गुरुवारी 22 फेब्रुवारीलाही काही बांधकामे अंशतः पाडण्यात आली.

वास्तविक पाहता दाबोळी भागात विमानांचे लॅडींग होत असलेला परिसर हा 'फनेल झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. ‘फनेल झोन’च्या क्षेत्रात कोणत्याही बांधकामाला परवानगी नाही. मात्र बेकायदेशीरपणे सुमारे 74 बांधकामे उभी राहिली आहेत.

या बांधकामांना मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाने (एमपीडीए) परवानगी दिलेली नाही. या परिसरात विमानांच्या लॅण्डीग वेळी एखादी अघटित घटना घडली तर मोठा हाहाकार माजेल.

त्यामुळेच या परिसरात घर किंवा इमारत बांधणेही धोक्याचे असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

भारतीय नौदलाने फनेल झोनमधील काही बांधकामांच्या उंचीबाबत उच्च न्यायालयात माहिती दिल्यावर न्यायालयाने मुरगाव विकास व नियोजन प्राधिकरणाला आदेश दिले होते.

ज्या घरांची उंची निर्धारित उंचीपेक्षा अधिक आहे, ते अतिरिक्त उंचीचे बांधकाम पाडण्याचे काम प्राधिकरणाने हाती घेतले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये दाबोळी येथील फनेल झोनमधील काही बांधकामे अशंतः पाडण्यात आली आहे. आपल्या घरांवर कधीही जेसीबी फिरविला जाईल, ही भीती स्थानिकांना सतावित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com