Cortalim News: मेगा हाऊसिंग प्रकल्पाला स्‍थानिकांचा जोरदार विरोध

Cortalim News: सांकवाळ पंचायतीमधील बैठक बारगळली
Cortalim  News
Cortalim NewsDainik Gomantak

Cortalim News: सांकवाळ पंचायत क्षेत्रातील सावरफोंड येथे होऊ घातलेल्‍या मेगा हाऊसिंग प्रकल्पाला आज सकाळी पंचायत मंडळाच्या बैठकीत अधिकृत मान्‍यता देण्‍यात येणार होती. परंतु सरपंच रोहिणी तोरस्कर, उपसरपंच गिरीश पिल्ले व पंचायत सचिव वालीस हे दोनदा उठून गेल्याने बैठक पूर्ण होऊ शकली नाही.

त्‍यामुळे प्रकल्‍पाला मंजुरी मिळू शकलेली नाही. यावेळी सत्ताधारी पंच, विरोधातील पंच व ग्रामस्थांमध्ये शाब्‍दिक बाचाबाची झाली. बैठक सुरू होताच सुकोरीना वालीस व विरोधी गटातील पंच मावरेलियो कार्वालो यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाले.

हेच निमित्त पुढे करून सरपंच व उपसपंच हे सचिवांसह उठून गेले. परंतु, उपस्थितांनी गोंधळ माजवल्याने तसेच बैठक सुरू करण्याचा आग्रह धरल्याने ते परत आसनस्थ झाले.

यावेळी उपसरपंच गिरीश पिल्ले म्हणाले, आम्ही नाहक अपमान सहन करणार नाही. विरोधी गटातील पंच तुळशीदास नाईक म्हणाले, पंचायत सचिव बैठकीची नोंदवही घेऊन बाहेर जाऊ शकत नाहीत. यावेळी प्रश्‍‍नांची सरबत्ती झाली.

सावळफोंड ग्रामस्थांचा मेगा प्रकल्पाला कायमस्वरूपी विरोध असणार असल्याचे साकवाळ ग्रामस्थां बरोबर विरोधी पंचांनी एकमताने निर्णय घेऊन सांगितले आहे.

साकवाळ पंचायतीच्या प्रभाग २ मधील सावळफोंड येथे परमेश कॉर्पोरेट कंपनी तर्फे 35 हजार चौ.मी जागेत, 650 फ्लॅट, 70 व्हीला, पाच जलतरण तलाव अशा मोठा मेगा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पाला पुर्वीच मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाने मान्यता दिली असून साकवाळ पंचायतीने 11 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत मेगा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

सदर मेगा प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याने, सावळफोंंड ग्रामस्थांनी एकत्रीत येऊन मेगा प्रकल्पाला तीव्र विरोध केला.

Cortalim  News
Goa Congress: मोदी राजवटीत SBIने ग्राहकांचा विश्वास गमावला; मात्र काँग्रेसची सत्ता आल्यावर चित्र वेगळे असणार - अमित पाटकर

तसेच पंचायतीने सुद्धा ग्रामस्थांच्या बरोबर राहून मेगा प्रकल्पाला देण्यात आलेली मान्यता रद्द करावी, अशी मागणी केली होती.

साकवाळ पंचायतीत मेगा प्रकल्प उभारल्यास वन्यजीवांना धोका निर्माण होऊ शकतो.तसेच झाडांची, विहीरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

यासाठी पंचायतीने मेगा प्रकल्पाला दिलेला परवाना रद्द करावा अशी मागणी ग्रामस्थांनी व विरोधी पंचांनी बैठकीत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com