Goa : प्रदूषणाच्या विळख्यात कुंकळ्ळी मतदारसंघ

औद्योगिक वसाहत ठरतेय स्‍थानिकांना डोकेदुखी : आराखड्याअभावी प्रकल्‍पांची दुर्दशा; विकासप्रकल्‍प ठरताहेत डोईजड Goa
Cuncolim : Palika Commercial Project,Cuncolim Goa.
Cuncolim : Palika Commercial Project,Cuncolim Goa.Dainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी : ऐतिहासिक पार्श्वभूमी (Historical Link) असलेल्या व क्रांतीकारांच्या मतदारसंघाला योग्य सक्षम, मजबूत व धडाडीचे नेतृत्व कधी लाभलेच नाही. ज्या कुंकळ्‍ळीने गोवा मुक्तीसंग्रामात (Goa Freedom war) मोठे योगदान दिले, ज्या मतदारसंघाने जनमत कौलाची मशाल पेटवली, तो कुंकळ्‍ळी मतदारसंघ गोवा मुक्तीनंतर चाळीस वर्षे उपेक्षितच राहिला. या मतदारसंघाचा थोडाफार विकास झाला तो ज्योकीम आलेमाव मंत्री बनल्यावर. आलेमाव यांनी या मतदारसंघाचा विकास साधला. मात्र, योग्य नियोजन व मास्टरप्लॅन (Master Plan) नसल्यामुळे विकासाचा फायदा हवा तसा होऊ शकला नाही. नियोजनाअभावी या विकास प्रकल्पांची पार दुर्दशा झालेली आहे, तर काही प्रकल्प पांढरे हत्ती ठरले आहेत. विकासाच्या नावावर उभारलेल्या या प्रकल्पांची गत आता ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी झाली आहे. अनेक प्रकल्प उद्धाराच्या प्रतीक्षेत असून सरकारी निधी (Government Money) पाण्यात गेला. वरून नाहक मतदारांची डोकेदुखी वाढली आहे.

Cuncolim : Palika Commercial Project,Cuncolim Goa.
कोल्हापुरातून मुलीचे अपहरण करणाऱ्याला 'गोव्यात' अटक

विकासाच्या नावावर व रोजगार उपलब्ध होणार म्हणून कुंकळ्‍ळीत स्थापन केलेली राज्यातील सगळ्यात मोठी औद्योगिक वसाहत या मतदारसंघातील लोकांसाठी शापित ठरली आहे. प्रदूषण पसरविण्यात अग्रेसर ठरलेल्या औद्योगिक वसाहतीचा पाया रचला काँग्रेसने आणि कळस उभारला भाजपने. काँग्रेस सरकारने वीजभक्षक लोह कारखाने व प्रदूषणकारी घातक रासायनिक कचरा निर्माण करणारे कारखाने आणले, तर भाजप सरकारने प्रदूषणकारी मासळी प्रक्रिया प्रकल्प आणून या मतदारसंघाला ‘डम्पिंग यार्ड’ बनविले. औद्योगिक वसाहतीमुळे मतदारांना मिळाले फक्त प्रदूषण व रोजगाराच्या नावाने ‘ठणठणपाळ’. गेली तीस वर्षे कुंकळ्‍ळीची जनता प्रदूषण भोगत आहे, मात्र, हे बंद करण्याचे धाडस असलेला आमदार या मतदारसंघाला न लाभणे हे मतदारांचे दुर्दैव.

पंचायतक्षेत्रेही उपेक्षित
या मतदारसंघातील कुंकळ्‍ळी पालिकेत विकास दिसत असला, तरी पंचायत क्षेत्रे आजही उपेक्षित आहेत. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात जोडलेल्या व अनुसूचित जमातीचे प्राबल्य असलेले आंबावली पंचायत क्षेत्र विकासाच्या प्रतीक्षेत आहे. या भागातील लोकांना ‘एसटी’ योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी काम केलेले दिसत नाही. गेल्या निवडणुकीत मतदारसंघाला जोडलेल्या बाळ्ळी पंचायतीची स्थिती दयनीय आहे. या भागातील हिंदू मतदार स्मशानभूमीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करीत आहेत. पण, ही मागणी मान्य करण्याचे धाडस विद्यमान आमदारांत दिसले नाही. रेल्वे ‘अंडर पास’ही गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली चांदर, गिरदोली व माकाझानवासीयांची मागणी यंदा पूर्ण झाली. तसे पाहिले तर विकासाच्या बाबतीत या मतदारसंघातील सर्व पंचायती उपेक्षित राहिल्या.

नेतृत्‍वे उदंड जाहली, पण...
या मतदारसंघाचे नेतृत्व मोठमोठ्या नेत्यांनी केले. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश फेर्दिन रिबेलो, स्वातंत्र्यसैनिक रॉक सातांन फर्नांडिस, मुख्याध्यापक मारियो वाझ, मानू फर्नांडिस, आरेसियो डिसोझा, ज्योकीम आलेमाव, राजन नाईक व विद्यमान आमदार क्लाफास डायस यासारखे आमदार या मतदारसंघाला मिळाले. मात्र, ज्या मतदारसंघातल्‍या लोकांनी गोवा मुक्तीसाठी रक्त सांडले व जो संघर्ष केला त्याचे अपेक्षित फळ मात्र या मतदारसंघाला लाभले नाही. राजन नाईक अपवाद सोडल्यास जवळ जवळ चाळीस टक्के मतदार असलेल्या हिंदूंना या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी लाभली नाही.

सक्षम जनसेवकाची प्रतीक्षा
गोव्याची शान असलेला ऐतिहासिक महत्त्वाचा व कदंब राज्याची राजधानी असलेला चांदर गाव या मतदारसंघात आहे. या गावचे सौंदर्य, ऐतिहासिक वारसा सांभाळून ठेवणारा आमदार हवाय. गिरदोली, माकाझान, आंबावली हे गाव आजही मुख्य प्रवाहापासून फार लांब आहेत. त्या गावचा विकास साधून त्या गावांना मुख्य प्रवाहात आणण्याचे धाडस असलेला आमदार लोकांना हवाय. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघातील लोक वाहतूक कोंडीच्या गर्तेत सापडलेले आहेत. महामार्ग बगल रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यावर उपाय काढणारा आमदार हवा आहे. मतदारसंघात शेती व्यवसाय कोलमडला आहे. शेतीप्रधान क्षेत्र म्हणून नाव मिळविलेल्या या मतदारसंघात पुन्हा सुगीचे दिवस दाखविणारा नेता हवा आहे. मतदार अशा सक्षम, हुशार, जनसेवकाच्या प्रतीक्षेत आहेत.

Cuncolim : Palika Commercial Project,Cuncolim Goa.
Fuel price in Goa: बीअरच्या टीन पेक्षा पेट्रोल महागले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com