

Woman Died on the spot at the touch of a High Voltage Star
खड्डे-बाळ्ळी येथून दुर्दैवी घटना समोर येतेय. बाळ्ळी येथील रहिवासी चंद्रावती वेळीप यांचा त्यांच्या घराच्या वरून गेलेल्या विद्युत वीज वहिनीला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
चंद्रावती शाबा वेळीप (वय 60) असे या दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी चंद्रावती या घराच्या छतावर मासळी सुकवण्यासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांचा स्पर्श त्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीशी झाला.
हाय होल्टेज तारेचा इतका जबर झटका त्यांना बसला की त्या जागीच गतप्राण झाल्या. या घटनेची माहिती कुंकळ्ळी पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला.
पंचनाम्यावेळी त्यांची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली गेली. सदर महिलेच्या पश्चात कुटुंबात किती सदस्य आहेत या विषयी माहिती अद्याप समजू शकली नाही.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.