Ganesh Festival : चित्रशाळांमध्ये लगबग; मूर्तींवर अखेरचा हात

रंगकाम सुरू; यंदा जाणवली चिकण मातीची टंचाई
चित्रशाळांमध्ये लगबग; मूर्तींवर अखेरचा हात
चित्रशाळांमध्ये लगबग; मूर्तींवर अखेरचा हातसंग्रहित
Published on
Updated on

काणकोण : गणपतीच्या चित्र शाळांतून मूर्ती रंगू लागल्या आहेत.मूर्तिकार मूर्तींत रंग भरण्यास दंग झाले आहेत.यंदा चतुर्थी 31ऑगस्टला आली आहे जेमतेम मुर्तीकारांच्या हातात बारा दिवस आहेत.त्यामुळे काणकोणातील सर्वच चित्रशाळांमध्ये लगबग सुरू आहे.

चित्रशाळांमध्ये लगबग; मूर्तींवर अखेरचा हात
Portuguese-Era Prison : माळोलीतील पोर्तुगीजकालीन तुरुंगाची दूरवस्था

काणकोणातील मूर्तिकारांपुढे शाडूच्या(चिकण मातीची) समस्या दरवर्षी बिकट बनत चालली आहे. पूर्वी चिकण माती चावडी येथील कदंब बसस्थानकासमोरील शेतात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत होती. मात्र, रवींद्र भवनाच्या बांधकामामुळे मातीत दगड धोंडे मिसळल्याने ही माती मूर्ती घडविण्यास निरूपयोगी ठरली आहे.

माजाळी येथील तळ्यातून पूर्वी काणकोणातील मूर्तीकार माती आणत होते. मात्र त्या तळ्यात ही मातीचा अभाव आहे. त्यावर उपाय म्हणून आता सावंतवाडीहून चिकण माती आणावी लागते, असे मनोज प्रभूगावकर यांनी सांगितले. त्यामुळे मातीचे दर वाढलेत.

यंदा मूर्ती सुकण्यास अडथळा

यंदा 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे.आणि त्यातच जून -जुलै महिन्यात पावसाने जोर धरल्याने मूर्ती सुकण्यास अडथळा निर्माण झाला. काही मूर्तीकारांचे नियोजन चुकले.येत्या वर्षी १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे, त्यामुळे यंदा पेक्षा पुढच्या वर्षी सुमारे पंधरा दिवस जादा मिळणार असल्याचे प्रभूगावकर यांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com