Goa Cruise: पर्यटन हंगामात प्रथमच एकाचवेळी 2 क्रूझ जहाजे मुरगाव बंदरात दाखल

पारंपरिक नृत्य, गाण्यांद्वारे प्रवाशांचे स्वागत
Goa-cruise
Goa-cruiseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cruise: गोव्याच्या पर्यटन हंगामाला सुरूवात होऊन आता दीड महिना होत आला आहे. देशविदेशातून गोव्याकडे पर्यटक येत आहेत. दरम्यान, मुरगाव बंदरात पर्यटकांची दोन क्रुझ जहाजे शनिवारी एकाच वेळी दाखल झाली.

'एमव्ही रेसिलेन लेडी' या क्रुझ जहाजाने मुरगाव बंदरात नांगर टाकला. यावेळी मुरगाव पोर्ट ऑथोरिटीचे चेअरपर्सन डॉ एन. विनोदकुमार, डीआय चेअरपर्सन आणि बंदराचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि जहाजाचे कॅप्टन उपस्थित होते. दोन्हीकडील अधिकाऱ्यांच्यात यावेळी संवाद झाला.

Goa-cruise
Goa Highways Speed Limit: गोव्यातील महामार्गांवर वेगमर्यादा निश्चित्त होणार; 70 किमी प्रतितास टॉप स्पीड शक्य?

जहाजाच्या कॅप्टनने इमिग्रेशन, कस्टम्स, ट्रॅव्हल आणि टूर ऑपरेटर यांसारख्या सर्व प्राधिकरणांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गोवा टूरिझमतर्फे पारंपरिक नृत्य, गाणी आणि स्मरणिकांद्वारे प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर रात्री 8 वाजता हे क्रुझ जहाज पुढील डेस्टिनेशन असलेल्या कोलंबोकडे रवाना झाले.

दरम्यान, 'एमव्ही कोस्टा सेरेना' हे क्रुझ जहाजदेखील शनिवारीच मुरगाव बंदरात दाखल झाले. या जहाजातून 1583 प्रवासी आणि 986 कर्मचारी आले. या जहाजाजे रात्रभर मुक्काम केला आणि रविवारी ते पुढील प्रवासासाठी निघाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com