फातोर्डा : आज सोमवारपासून मडगाव नगरपालिकेत आगाऊ कर भरणा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे थकित आणि आगाऊ कर जमा करण्यासाठी लघू व्यावसयिकांनी गर्दी केली होती. पहाटे पालिकेचे कार्यालय उघडण्यापूर्वी अनेकजण येऊन थांबले होते. वाढती गर्दी लक्षात घेता मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर या ठिकाणी हजर होते.
यापूर्वी नगरपालिकेच्या थकबाकी वसुली पथकाने करदात्यांची घरी, दुकानावर प्रत्यक्षपणे जात १ कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा करण्यात यश मिळविले आहे. काही वर्षांपासून रखडून पडलेली घरपट्टी व व्यावसायिक कर थकबाकी १६ ते १७ कोटींच्या घरात पोचली होती. त्यामुळे वसुली पथकाने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये करदात्यांच्या घरी, दुकानांत जाऊन रक्कम वसूल केली.
खिडकीद्वारे कर घ्या!
घरपट्टी कर व व्यावसायिक कर एकाच कचेरीत आकारण्यात येत आल्याने करदात्यांची मोठी गर्दी होऊन गोंधळ उडाला होता. त्यामुळे खिडकीद्वारे कर भरण्याची सोय करावी, अशी मागणी नगराध्यक्षांकडे करदात्यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.