गोवा सरकारातील मंत्र्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार..!

गुन्हेगारी वृत्तीला मुख्यमंत्र्यांच्या पदराचा आधार...
Goa Crime पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश चोडणकर
Goa Crime पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश चोडणकर Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime : गोव्यात मागील काही दिवस बघता महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. महिलांच्या बाबतीत गुन्हेगारीचा आकडा वाढताना दिसत आहे. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी राज्यातील एक मंत्र्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. "गोव्यातील भाजप सरकार मधील एका मंत्र्याने राजकीय दडपशाही करत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे चोडणकर यांनी म्हणले आहे.

Goa Crime पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश चोडणकर
राज्यसभेत गाजली कोकणी भाषा; लुईझिन फालेरो यांनी घेतली 'शपथ'
Goa Crime पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश चोडणकर
Goa Crime पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश चोडणकर Dainik Gomantak

मात्र संबंधित मंत्र्याचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. संबंधित मंत्र्याच्या विरोधात सबळ पुरावे हाती असल्याची माहितीही त्यांनी पणजी येथील काँग्रेस (Congress) येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

लैंगिक अत्याचारच्या या घटनेमध्ये अडकलेल्या या संबंधित मंत्र्याने महिलेला मॅसेज आणि व्हिडिओ पाठवून मानसिक त्रास दिला असून, हे मॅसेज आणि व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ आणि मॅसेज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंतही पोहोचले असून, अद्याप त्यांनी यावर कोणतीही अॅक्शन घेतलेली नाही, या उलट संबंधित मंत्र्याला ते पाठिशी घालत आहेत. ज्यात याआधीही घडलेल्या बलात्कार प्रकरणांत सरकारशी लागेबांधे असलेल्यांचा संबंध आहे. पण भाजप सरकारने पद्धतशीरपणे त्यांना अशा प्रकरणांतून बाहेर काढले आहे. त्यामुळेच पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, असेही चोडणकर यांनी नमूद केले.


गुन्हेगारी वृत्तीला मुख्यमंत्र्यांचे पाठबळ

लैंगिक अत्याचारच्या प्रकरणात सहभागी असलेल्या मंत्र्याबाबत CM डॉ. प्रमोद सावंत यांना सर्व कल्पना आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली.

Goa Crime पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश चोडणकर
अडीच महिन्‍यांपासून कचऱ्याच्या साम्राज्यात पेडणेकरांचे वास्तव्य..!

देशापेक्षा दुप्पट होतायेत राज्यात बलात्कार

देशात बलात्काराचा सरासरी दर 4.3 टक्के आहे. पण गोव्यात हाच दर दुप्पट म्हणजेच 7.8 टक्के इतका आहे. यामध्ये 66 टक्के अल्पवयीन मुलींचा समावेश आहे, अशी माहिती गिरीश चोडणकर यांनी दिली.

रक्षकच झाला भक्षक

राज्यातील महिलांच्या सुरक्षतेबाबत चिंता असून जनतेच्या सुरक्षेची शपथ घेतलेले मंत्रीच आज लैंगिक अत्याचारच्या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर येत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा, स्वत:ला सुरक्षित कसे मानायचे का?, असे सवाल बीना नाईक यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या संबंधित मंत्र्याची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

गिरीश चोडणकरांचा भाजपला इशारा

19 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गोवा दौरा आहे. या पूर्वी CM सावंत यांनी संबंधित मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी किंवा त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com