Chhatrapati Shivaji Maharaj: पुन्हा कृष्णकृत्य ! बनावट अकाउंटद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान

Chhatrapati Shivaji Maharaj: दोन धर्मात धार्मिक तेढ निर्मण करून राज्यातील शांतता भंग करण्याचे प्रकार याआधी बरेच वेळा घडले
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak
Published on
Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj: दोन धर्मात धार्मिक तेढ निर्मण करून राज्यातील शांतता भंग करण्याचे प्रकार याआधी बरेच वेळा घडले असून आता पुन्हाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे फोटो शेअर करण्याचे कृत्य कुडचडे येथे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुस्लिम समाजातील दोन तरुणांनी सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे फोटो शेअर केले होते.

या घटनेचा निषेध करत बजरंग दलाने या घटनेची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. दरम्यान या प्रकरणी संबंधित तरुणांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचेही समजतेय.

गोव्यात याआधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याच्या घटना घडल्या होत्या. करासवाडा- आकय येथील येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी केलेली विटंबना आणि त्याआधी फादर बोलमॅक्स परेरा यांनी महाराजांसंबंधी वादग्रस्त वक्तव्य करून गोव्यातील जनतेच्या भावना दुखवल्या होत्या.

आता पुन्हा महाराजांबद्दल आक्षेपाहार्य कृती केली असल्याने हा प्रकार जाणूनबुजून केला जातोय का याबाबतचा शोध घेण्यात यावा अशी मागणी समाजातून होताना दिसतेय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com