Goa Crime Case: वाढत्या लैंगिक गुन्ह्यांना मूल्यांचा ऱ्हास कारणीभूत!

नीतिमूल्यांचा ऱ्हास, संस्कारांचा अभाव, वेगवेगळे गॅझेट यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक, यांच्यामधला संवाद संपला आहे.
Crime Case
Crime CaseDainik Gomantak

Crime Case नीती मूल्यांचा ऱ्हास, संस्कारांचा अभाव, बिघडलेले कौटुंबिक स्वास्थ्य, आणि नव्या गॅजेटचा चुकीचा उपयोग ही वाढत्या विनयभंग आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकारांची कारणे आहेत, असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले आहेत.

अलीकडच्या काळात विनयभंग, बलात्कार आणि त्यातून निर्माण होणारे लैंगिकतेसंबंधीचे गुन्हे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. ह्या गुन्ह्यांच्या घटना प्राथमिक ते महाविद्यालयीन विद्यार्थी , विद्यार्थिनी शिक्षक आणि जवळच्या व्यक्तींशी संबंधित आहेत.

अशा घटनांना अनेक कारणे असली तरी बहुतांश तज्ञांच्या मध्ये नीती मूल्यांचा झालेला ऱ्हास, संस्कारांचा अभाव, बिघडलेले कौटुंबिक स्वास्थ्य, मोबाईलचा अतिवापर, त्यातून निर्माण होणारी आभासी जवळीकता, मिळणारी चुकीची माहिती ही असल्याचे मत शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत.

पाच वर्षांत 394 बलात्कार नोंद

गेल्या पाच वर्षांत राज्यात झालेल्या महिलांवरील अत्याचारांच्या अहवालातील आकडेवारी स्पष्ट केली झाली. 2018 ते 2023 या कालावधीत महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

तसेच अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सुद्धा भयंकर वाढले असल्याचे या सादर केलेल्या अहवालात दाखविण्यात आले. पाच वर्षात बलात्काराच्या 394 घटना, अपहरणाच्या 385 घटना नोंद आहेत.

Crime Case
'व्हॉल्युम कम कर...' ‘प्रदूषण नियंत्रण’चा इशारा; तक्रारीची वाट न पाहता होणार कारवाई

लैंगिकतेशी संबंधित घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यावर सरकारी पातळीवर उपाययोजनांची गरज आहेच.

मात्र नीतिमूल्यांचा ऱ्हास, संस्कारांचा अभाव, मुलांच्या हातात आलेली वेगवेगळे गॅझेट यामुळे शिक्षक - विद्यार्थी, पालक शिक्षक , पालक - पाल्य यांच्यामधला संवाद संपला आहे.

अशा बिकट परिस्थितीत लैंगिक शिक्षणाचा अभाव आहे. दुसरीकडे मोबाईल सारख्या यंत्रांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे.

आई-वडिलांकडून संगोपनाचा अतिरेक केला जात आहे,असे काही ठिकाणी जाणवते. त्यामुळे जीवनमूल्य बाजूला पडत आहेत.

-पौर्णिमा केरकर, शिक्षिका, लोकसाहित्याच्या अभ्यासिका

Crime Case
National Teachers Award 2023: गोव्यातील अविनाश पारखे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; शिक्षक दिनी वितरण

अलिकडच्या काळात सामाजिक संक्रमणाचा दर झपाट्याने वाढला आहे. या स्थित्यंतराच्या काळात संस्कार मूल्य मागे पडत आहेत. मुले - मुली, पुरुष - महिला एकत्रित येऊन काम करताना दिसत आहेत.

तरीही महिलांकडे पाहण्याची पारंपरिक वृत्ती कायम दिसते. यामुळेच अशा लैंगिकतेशी संबंधित गुन्ह्यांच्या घटना वाढताना दिसून येतात. यासाठी महिलांनीच दक्ष राहणे गरजेचे आहे.

आई-वडिलांनीही मुलांशी संवाद वाढवला पाहिजे. छोट्या कुटुंबामुळे एकूणच जगण्यातला मुक्तपणा वाढला आहे. त्यामुळे चुकीचे पांयडेही वाढले आहेत. यावर कायद्याची अंमलबजावणी, समुपदेशन आणि संवाद महत्त्वाचा आहे.

पांडुरंग नाडकर्णी, शिक्षण तज्ज्ञ

Crime Case
Goa Crime Case: प्रेम, नशा, अनैतिक संबंध ठरताहेत हत्येला कारण!

वाढलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना हे सांस्कृतिक मूल्यांच्या ऱ्हासाचे लक्षण आहे. सामाजिक परिस्थितीचा समाजातील माणसांच्या विचारपद्धतीवर परिणाम होत असतो. सध्याची भांडवली बाजारू व्यवस्था चंगळवादी मूल्ये पसरवीत आहे.

प्रत्येक गोष्टीला (भावना, नातेसंबंध वगैरे) वस्तूच्या पातळीवर नेत आहे. त्यामुळे माणूस आणि प्राणी यांच्यात असलेला महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाची ‘संयम राखण्याची क्षमता’ हीच माणूस गमावत आहे.

- डॉ. रुपेश पाटकर, मनोविकारतज्ज्ञ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com