Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

Goa Accident News: उत्तर गोव्यातील थिवी परिसरात रविवारी रात्री एक भीषण आहे. एका भरधाव चारचाकी चालकानेअपघात घडला आहे.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

थिवी: उत्तर गोव्यातील थिवी परिसरात रविवारी रात्री एक भीषण आहे. एका भरधाव चारचाकी चालकानेअपघात घडला आहे. समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी एका दुर्दैवी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, चारचाकीमधील तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

नियंत्रण सुटले आणि काळ आला...

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही चारचाकी गाडी अत्यंत वेगाने थिवीच्या मुख्य रस्त्यावरून जात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन स्वतंत्र दुचाकींवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला.

Goa Accident
Goa Road: हॉटमिक्‍स डांबरीकरणानंतर 5 वर्षे रस्‍ते खोदाईस बंदी! नोडल प्राधिकरणाची स्‍थापना; अधिसूचना जारी

मद्यधुंद चालकाच्या बेजबाबदारपणाचा फटका?

या अपघातात दोन जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून स्थानिकांनी तत्काळ रुग्णालयात हलवले. मात्र, दुर्दैवाने एका जखमीची प्राणज्योत मालवली. दुसऱ्या जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी असा दावा केला आहे की, चारचाकीमधील व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होत्या. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Goa Accident
Goa Crime: कौटुंबिक वादाचा भडका, मयेत सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला; संशयिताला बेड्या

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून चारचाकी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. जर चालकाने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालात सिद्ध झाले, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. थिवीममधील या घटनेने रस्ते सुरक्षेचा आणि 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com