Goa Crime : नौका, जहाजांसाठीच्या गुन्ह्यांमध्ये आता केवळ दंडात्मक कारवाई; तुरुंगवासाची शिक्षा टळली

बंदर कप्तानची अधिसूचना
Goa Crime
Goa CrimeFile Photo
Published on: 
Updated on: 

राज्यातील नद्यांमध्ये वावरणाऱ्या नौका आणि जहाजांनी नियमांचे उल्लंघन केल्यास यापूर्वी गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई केली जात होती. मात्र, यापुढे गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई केली जाणार नसल्याने तुरुंगवासाची शिक्षा होणार नाही. त्याऐवजी बंदर कप्तान खात्याने केवळ दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. सरकारकडून यासंदर्भात आज अधिसूचना जारी करण्यात आली.

Goa Crime
Porvorim News : कृत्रिम हातांना मेंदूचे बळ; 25 दिव्यांगांना मिळणार अत्याधुनिक हात

गोवा आंतरिक जहाज नोंदणी नियम आणि आंतरिक जहाज (बांधकाम आणि सर्वेक्षण) नियमात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. गोवा आंतरिक नोंदणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौका आणि जहाजांना आता दहा हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.

केंद्र सरकारने सर्व कायद्यांतील गुन्हेगारीचा नियम हटवण्याची सूचना राज्य सरकारांना केली होती. व्यवसाय सोपा करण्याच्या उपक्रमाचा हा एक भाग असून अनेक कायद्यांमध्ये दुरुस्ती केली आहे. बंदर कप्तान खात्याच्या हा कायद्यात गुन्हेगारीचा नियम होता, तो मागे घेण्यासंदर्भात ही अधिसूचना आहे. यापुढे केवळ दंडात्मक कारवाई केली जाईल.

- विकास गावणेकर, बंदर कप्तान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Couple Caned For Adultery In Indonesia
Goa Local Jobs In Industrial Estates
Goa Liquor Smuggling
POCSO Case Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com