NCB Raid At Anjuna: एनसीबीचे धाडसत्र सुरूच! हणजूणमध्ये LSD लॅबवरील छाप्यात लाखोंचे ड्रग्ज जप्त

तब्बल 25. 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
Goa Drugs Cartel | NCB Raid At Anjuna
Goa Drugs Cartel | NCB Raid At AnjunaDainik Gomantak
Published on
Updated on

NCB Raid At Anjuna: राज्याभोवती सध्या ड्रग्ज माफियांचा विळखा घट्ट होत चालला आहे. एनसीबी हा विळखा तोडण्यासाठी जास्तच सक्रिय झाले असून हणजूणमध्ये टाकलेल्या छाप्यात त्यांनी ड्रग्ज तयार करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Goa Drugs Cartel | NCB Raid At Anjuna
Bardez News : नववधूकडून ‘मारिया’ला मुकुट प्रदान; 78 वर्षांपासून परंपरा

माहितीनुसार, हणजूणमध्ये LSD लॅब असून तिथे छुप्या पद्धतीने ड्रग्ज बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती एनसीबी पथकाला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचत त्यांनी या लॅबवर धाड टाकली आणि संबंधित आरोपीला ताब्यात घेतले.

यामध्ये संशयित ए. कांदू (मूळ- पश्चिम बंगाल) हा हे काम करत असल्याची माहिती पथकाला मिळाली असून तो इतर राज्यांमध्येही ड्रग्ज पुरवत असल्याचे समोर आले. या छाप्यात त्यांनी तब्बल 25. 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, पोलीस या आरोपीसोबत अजून कुणाचा सहभाग आहे का याची पडताळणी करत आहेत.

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी एनसीबीने गोव्यात सुरू असलेल्या रशियन ड्रग्ज कार्टेलचा पर्दाफाश केला होता. ज्यामध्ये रशियातील माजी ऑलिंपिक पदक विजेती जलतरणपटू स्वेतलाना, रशियातील निवृत्त पोलीस कर्मचारी आंद्रे आणि गोव्यातील आकाश नावाच्या व्यक्तीचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com