Goa Crime News: सुपारी काढताना वीजेच्या तारेचा स्पर्श; बागायतीत मोलमजुरी करणाऱ्या कामगाराचा मृत्यू

मृत कुडशे सत्तरी येथील
Goa Crime
Goa Crime Dainik Gomantak

Goa News: धडीचे मळ उस्ते सत्तरी येथे पोफळीच्या बागेत सुपारी काढत असताना 11 केव्ही विद्युत वाहीनीचा स्पर्श लागुन कुडशे सत्तरी येथे कामगार सुरेश सातु सावंत (35) याचा जागीच अपघाती मृत्यु झाल्याची घटना आज रविवारी 3 च्या सुमारास घडली आहे.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार धडीचे मळ उस्ते येथील विश्राम गोविंद नाईक (81) यांच्या मालकीच्या फार्म हाऊसच्या बागेत पोफळीच्या बागेत सुपारी काढण्यासाठी कुडशे सत्तरी येथील सुरेश सावंत काम करत होता.

Goa Crime
CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी केले मध्य प्रदेशातील कार्यकर्त्याच्या घरी भोजन

सुपारी काढताना त्याच्या हातात असलेला अॅल्युमिनियमच्या दांड्याचा स्पर्श 11 केव्हीच्या मुख्य विद्युत वाहिनीला झाला. त्यामुळे वीजेचा जोराचा धक्का सुरेशला बसला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला.

सुरेश हा बागायतीत मोल मजुरी करायचा. या घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलिस घटनास्थळी दाखल झाले. धडीचे मळ उस्ते हा परिसर उंच अशा ठिकाणी असल्याने वाहन पोहचणे कठिण होते.

Goa Crime
Goa Crime: दिल्लीच्या दोन पर्यटकांना शिवोलीत बेदम मारहाण; हॉटेल कर्मचाऱ्यांवर आरोप

त्यात वाळपई पोलिसांकडे मृत्यदेह आणण्यासाठी वाहन नसल्याने उशिरापर्यंत मृत्यदेह घटनास्थळी तसाच होता.

रात्री उशीरा मृतदेह गोवा मेडिकर कॉलेज रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास वाळपई पोलिस निरिक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com