Colvale Jail: सॅनिटायझर अंगावर ओतून कैद्यानं पेटवलं; कोलवाळ कारागृहात सतावणुकीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

Goa Crime News: कोलवाळ कारागृहातील दवाखान्यात आज सकाळी कैदी राजू दास याने सॅनिटायझर पिऊन तसेच अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
colvale jail
colvale jailDainik Gomantak
Published on
Updated on

Colvale: कोलवाळ कारागृहातील दवाखान्यात आज सकाळी कैदी राजू दास याने सॅनिटायझर पिऊन तसेच अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो ५० टक्के होरपळला असून त्याला गोमेकॉत दाखल केले आहे.

ही घटना काल (10 ऑक्टोबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. उपचारासाठी इस्पितळात नेण्यास तुरुंग अधिकाऱ्यांकडून विलंब झाल्याने त्याची प्रकृती नाजूक बनली आहे. या घटनेची कोलवाळ पोलिस चौकशी करत आहेत. कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सतावणुकीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी कैद्यांमध्ये चर्चा आहे.

कैदी राजू दास याला तेथील दवाखान्यातील काम दिले होते. त्यामुळे तो नाराज होता. त्याने अनेकदा हे काम नको, असे तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, कोणीच ऐकत नसल्याने त्याचे गेल्या काही दिवसांपासून मानसिक संतुलन ढळले होते. आज सकाळी दवाखान्यात कैद्यांची तपासणी सुरू होती. त्यावेळी तो सॅनिटायझर घेऊन खोलीत गेला आणि दार बंद केले. त्याने अगोदर सॅनिटायझर प्राशन केले. नंतर अंगावर ओतून आग लावली.

गोवा

colvale jail
Colvale Jail: कैद्याकडून वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी! कोलवाळ कारागृहात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नोंदवहीच गायब

कैदी राजू दास याने आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा तेथे असलेल्या कैद्यांनी जेलरला माहिती दिली. जेलरने ती तुरुंग अधीक्षकांना दिली. त्यांना येण्यास बराच उशीर झाला. आल्यानंतर या कैद्याला खोलीतून बाहेर काढण्याऐवजी अधिकाऱ्यांनी उपस्‍थित कैद्यांकडे चौकशी केली. दवाखान्यात येणाऱ्या - जाणाऱ्यांसाठी नोंदवही ठेवलेली असते. अधिकाऱ्यांना झालेला उशीर नोंद होऊ नये म्हणून ही नोंदवहीच गायब करण्यात आली.

रुग्णालयात नेण्यास झाला विलंब

राजूला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने त्याची प्रकृती घटनास्थळीच खालावली. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातून ही माहिती मिळवून या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड होऊ शकतो, असे कारागृहातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. यापूर्वीही कारागृहात अनागोंदी कारभार घडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com