Online Fraud : बोगस ‘ॲप’ व्यवहारातून तब्‍बल 12 लाखांना गंडा

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगोंद-काणकोण येथील महिलेने ऑनलाईनवरील ‘शॉपी ॲप’मध्ये गुंतविलेल्या रकमेवर भरमसाठ व्याज मिळेल या मोहापायी मार्च 2022 पासून वारवांर पैसे गुंतवले.
online fraud
online fraud Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : ऑनलाईनवरील ‘शॉपी ॲप’मध्ये पैसे गुंतवल्यास त्याच्या बदल्यात भरमसाठ परत रक्कम मिळेल, या आमिषाने आगोंद-काणकोण येथील एका महिलेने 12 लाख रुपये गुंतवले होते. काही महिन्यानंतर हा ॲपच बंद झाल्याने संबंधितांकडून फसवणूक झाल्याची तक्रार रायबंदर सायबर कक्षाकडे तिने दिली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

(fraud of 12 lakhs from bogus app transaction)

online fraud
Goa Festivals : उत्सवांत नियमांचे पालन करा

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगोंद-काणकोण येथील महिलेने ऑनलाईनवरील ‘शॉपी ॲप’मध्ये गुंतविलेल्या रकमेवर भरमसाठ व्याज मिळेल या मोहापायी मार्च 2022 पासून वारवांर पैसे गुंतवले. तिला काही महिन्यांनंतर मोठी रक्कम पाठविली जाईल, असा मेसेज आला होता. हा ॲप सुरू असल्याने तिचा त्यावर विश्‍वास बसला होता. काही दिवसांपूर्वी तिने पुन्हा या ॲपवर गुंतवणूक केलेल्या रकमेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता हा ॲपच गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले.

मोबाईल नंबर होता अज्ञाताचा

1. ज्या मोबाईल क्रमांकावर हा शॉपी ॲप तयार करण्यात आला होता, तो अज्ञाताचा असल्याचे चौकशीत उघड झाले. मोठ्या रकमेला फसविले गेल्याचे लक्षात येताच तिने सायबर कक्षात तक्रार दाखल केली आहे.

2. लोकांनी ऑनलाईन गुंतवणुकीचे व्यवहार करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवहार करू नयेत व सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सायबर कक्षाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com