Goa Crime: सुडाग्नी...सुरी खुपसून गुप्तांगही कापले! पर्रातील खून प्रकरणी बाप-लेकाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

Parra Murder Case: ओडिशातील आपल्याच नातेवाईक कामगाराचा निर्घृणपणे खून केलेल्या बाप व लेकाला बुधवारी (ता.९) म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: ओडिशातील आपल्याच नातेवाईक कामगाराचा निर्घृणपणे खून केलेल्या बाप व लेकाला बुधवारी (ता.९) म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, हा खून सूड भावनेने अगदी निर्दयपणे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

रात्री साइट सुपरवायझर घटनास्थळी आला असता हा खूनाचा प्रकार उघडकीस आला होता. खून करून दोघेही संशयित पळून जाऊन नजीकच्या शेतात लपून बसले होते. कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. मयत हा संशयित सत्त्याचा भाचा असून फोंडेकवाडा, पर्रा येथे पत्र्याच्या झोपडीत तो राहत होता. सोमवारी (ता.७) रात्री ९च्या सुमारास या झोपडीत द्रौपदचा मृतदेह आढळला होता.

Goa Crime
Goa Politics: "विधानसभेत आमचे प्रश्न ऐकले नाहीत तर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणार", विजय सरदेसाईंचा सरकारला इशारा

मारहाणीचा बदला...

खुनाच्या आदल्या दिवशी मयत द्रौपद नाईक याने आपला मामा संशयित सत्त्याला म्हापसा बसस्थानकाजवळ मारहाण केली होती. याची माहिती त्याने आपला मुलगा थाबिरला दिल्यानंतर बदला घेण्यासाठी या बाप व लेकाने द्रौपद याला पर्रा येथे झोपडीत गाठून निर्दयपणे ठार मारल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

असा केला खून

संशयित सत्त्या नबरंगपुरा (५०) व थाबिर नबरंगपुरा (३१) या दोघांनी मिळून द्रौपद याचा आधी कमर पट्ट्याच्या साहाय्याने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. परंतु द्रौपदने प्रतिकार केल्याने थाबिरने लोखंडी रॉडने द्रौपदच्या डोक्यावर अनेक वार केले. दरम्यान, सत्त्याने द्रौपदच्या पोटात सुरी खुपसून त्याचे गुप्तांगदेखील कापले.

Goa Crime
Goa Kala Academy: कला अकादमीच्या कामाचे पुन्‍हा होणार स्‍ट्रक्‍चरल ऑडिट, 'पीडब्‍ल्‍यूडी'चा मोठा निर्णय

दिवसभर वादावादी व रात्री मद्यधुंद!

घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी मयत द्रौपदने आपला मामा संशयित सत्त्या याला मारहाण केल्याचे त्याने आपला मुलगा थाबिर याला सांगितले होते. त्यामुळे सोमवारी कामावर सकाळपासून त्या तिघांत खटके व बाचाबाची सुरू होती.

त्यानंतर, रात्री झोपडीत तिघेही दारू पिण्यास बसले होते. तिथे मद्यधुंद बाप-लेकाने द्रौपद याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला संपविले. फोंडेकवाडा येथे एका व्हिलाचे बांधकाम सुरू असून हे तिघेही गवंडी म्हणून कामाला होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com