Portuguese Laws in Goa: गोव्यात मागील काही महिन्यांमध्ये गुन्ह्यांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. खून, महिला/अल्पवयीन मुलींवरील अत्याचार तसेच चोरीच्या घटना चिंतेची बाब बनले आहेत.
यावर गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई यांनी वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्याने पूर्वीच्या पोर्तुगीज राजवटीप्रमाणे कठोर कायदे लागू करावेत, अशी मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना सरदेसाई यांनी राज्यातील वाढती गुन्हेगारी, विशेषत: हाय प्रोफाईल पोलिस अधिकार्यांचा काही घटनांमध्ये समावेश असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
विनयभंगासारख्या गुन्ह्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग हा चिंतेचा विषय असल्याचे ते म्हणाले.
'गोव्याच्या नाईट क्लबमध्ये विनयभंगाच्या घटनेत कथितरित्या सहभागी असलेल्या डीआयजी अधिकाऱ्याला किरकोळ शिक्षा देण्यात आली. यामुळे पुन्हा अशाच प्रकारची कृत्ये होण्याची दाट शक्यता आहे', असे ते म्हणाले.
त्यामुळे, राज्यात पोर्तुगीज राजवटीप्रमाणे कठोर कायदे केले पाहिजेत. राज्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी ते प्रतिबंधक म्हणून काम करतील. असे दिसते की हे कायदे ही आता काळाची गरज आहेत.
महिलांशी संबंधित गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी राज्यभरातील महिला पोलीस ठाण्यांना अधिसूचित करण्याची मागणीही सरदेसाई यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.