Goa Crime Case: धक्कादायक ! राज्यात अवघ्या 6 महिन्यांत बलात्काराची 43 प्रकरणे

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती
Goa Crime Case
Goa Crime CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime Case राज्यात यावर्षी गेल्या सहा महिन्यांत महिलांवरील अत्याचार तसेच बलात्काराचे 119 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी बलात्कारप्रकरणी 43 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील बहुतेक गुन्हे हे अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे आहेत.

त्यामुळे प्रत्येक महिन्याला 7 बलात्कार प्रकरणांची नोंद पोलिस स्थानकांत झाली आहे. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील प्रश्‍नावर लेखी उत्तरादाखल दिली.

Goa Crime Case
'दारू घेऊन धबधब्यांवर जाऊ नका'; गोवा वन खात्याकडून नियमावली जाहीर, जाणून घ्या सविस्तर

जानेवारी ते जून 2023 पर्यंत महिलांनी दाखल केलेल्या अत्याचारांच्या गुन्ह्यांची संख्या ११९ असून त्यामध्ये ४३ बलात्काराची प्रकरणे, ४० विनयभंग, २४ अपहरण, १० थट्टा-मस्करी आणि दोन वेश्‍या व्यवसाय प्रकरणांची नोंद झाली आहे.

एकूण नोंद झालेल्या प्रकरणांपैकी २० गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी तपासकाम करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या वर्षी बलात्कारचे ७३ तर ३८ थट्टा-मस्करीचे गुन्हे दाखल झाले होते. राज्यात महिलांवरील अत्याचार प्रकरणाचे १४ गुन्हे दाखल झाले आहेत.

Goa Crime Case
Goa Assembly Monsoon Session : स्मार्ट सिटी घोटाळ्याचे पाप कोणाचे? विरोधक आक्रमक

72 पोलिसांवर गुन्हे

गेल्या साडेचार वर्षांत पोलिस खात्यातील ७२ जणांविरोधात विविध प्रकरणांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. ज्या पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यातील ५० हून अधिक पोलिस कॉन्स्टेबल तर उर्वरित उपनिरीक्षक पदावरील अधिकारी आहेत.

मारहाण, शिवीगाळ, धमकी, फसवणूक, ड्रग्स, खून अशा गुन्ह्यांत समावेश असल्याची ही प्रकरणे आहेत. २०१९ साली १७ पोलिसांविरुद्ध गुन्हे झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com