Goa Crime Attack on clergy over property dispute
Goa Crime Attack on clergy over property dispute Dainik Gomantak

मालमत्ता वादातून धर्मगुरुंवर हल्ला

साळगाव येथील घटना : संशयितास पोलिस कोठडी; ग्रामस्‍थांकडून निषेध

कळंगुट : साळगाव येथे मालमत्तेच्या वादातून चर्चचे धर्मगुरु माथाईश रॉड्रिगीश यांच्यावर जोजफ डिसोझा या संशयिताने हल्ला केला. या हल्ल्यात (Goa Crime) धर्मगुरुंना किरकोळ जखमा झाल्या. प्राथमिक उपचारानंतर पोलिसांनी त्यांना घरी जाऊ देण्यात आले. मात्र, या हल्ल्‍याचे संतप्‍त पडसाद ग्रामस्‍थांकडून उमटले.

Goa Crime Attack on clergy over property dispute
कोमुनिदाद जमीनविक्रीत कोट्यवधींचा घोळ?

त्‍यात हिंदू व ख्रिश्‍‍चन बांधवांचाही समावेश होता. आमदार जयेश साळगावकर हेसुद्धा पोलिस स्‍थानकात मारहाण करणाऱ्या संशयिताला अटक करण्‍याच्‍या मागणीसाठी जमले होते. याप्रकरणी जोजफ डिसोझा या संशयिताविरोधात तक्रार दाखल केली आसून त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

संशयिताविरुद्ध कारवाई होणार : लोबो

देवस्थानचा पुजारी असो अथवा चर्चचे धर्मगुरु यांना मानसिक तसेच शारीरिक त्रास देणाऱ्या कुणालाही माफ केले जाणार नाही. संशयिताविरोधात ‘एफआयआर’ दाखल केली असून त्याला जबर शिक्षा होणारच. तसेच त्यांनी केलेल्या कथित बेकायदा बांधकामावर स्थानिक पंचायत मंडळाकडून कारवाई होईल, असे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.

Goa Crime Attack on clergy over property dispute
रिक्त जागा भरा आणि ​सेवेत रुजू करा; कामगारांची मागणी!

बांधकामाला घेतला आक्षेप?

पिकेन - मोरोड परिसरात असलेल्या ‘माय- दे- देऊश’ चर्चच्या मालमत्तेलगतच संशयित जोजफ डिसोझा आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांत तेथील जागेवरून गेली कित्येक वर्षे वाद आहे. हा वाद न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, या भागात चर्च इमारत, तसेच परिसर सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. संशयित डिसोझा याच्‍याकडून चर्च कंपाउंडला लागूनच कथित बेकायदा बांधकाम उभारण्यात आले होते. त्यामुळे चर्च समितीने या बांधकामाविरोधात आक्षेप घेत त्यासंबंधात स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारही दाखल केली होती.

पावसाचे पाणी साचल्‍याचे झाले निमित्त...

सोमवारी दुपारी चर्च नजीकच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याच्या निमित्ताने संशयित डिसोझा याने आपल्याला बोलावून घेत घाणेरडी शिवीगाळ केली व मारहाण केल्याची रितसर तक्रार धर्मगुरु रॉड्रिगीश यांच्याकडून पोलिसांत दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत साळगाव पोलिसांनी संशयित जोजफ डिसोझाच्या मुसक्या आवळल्या.

सध्या त्याची रवानगी स्थानिक कोठडीत केली आहे. दरम्यान, या मारहाण प्रकरणाची माहिती मिळताच मोठ्या संख्येने जमा झालेल्या हिंदू तसेच ख्रिस्ती बांधवांनी साळगाव पोलिस स्थानकात धडक देत संशयितास जबर शिक्षा करण्याची मागणी केली. यावेळी साळगावचे आमदार जयेश साळगावकर त्यांच्यासोबत उपस्‍थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com