Goa Crime : स्वातंत्र्यदिनी घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकवणारा आरोपी गजाआड

राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971 च्या कलम 2 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
man in goa hosted pakistan flag on house roof
man in goa hosted pakistan flag on house roof Dainik Gomantak
Published on
Updated on

काल दिमाखात संपूर्ण देशभरात भारताचा 75वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी गोव्यातही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यभर गोवा पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण दरम्यान एक अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एक इसमाने आपल्या घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकवत तिरंग्याचा अपमान केला आहे.

(man in goa hosted pakistan flag on house roof)

man in goa hosted pakistan flag on house roof
Konkan Railway Police : मडगावात वायू दलाच्या कर्मचाऱ्याने रेल्वेखाली संपवली जीवनयात्रा; पत्रात लिहीले...

फोंडा डीवायएसपी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय ध्वजाच्या वर पाकिस्तानचा ध्वज फडकत असल्याचे एका व्हायरल फोटोमध्ये दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत आरोपीवर कारवाईचा बडगा उचलला आहे. कायबुद्दीन अली (43, कुर्टी) असे झेंडा फडकवणाऱ्याचे नाव आहे.

नुकत्याच साजऱ्या झालेल्या ईदच्या वेळी धार्मिक ध्वज फडकल्याचे आढळून आले. अलीवर राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971 च्या कलम 2 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. कारण इतर कोणत्याही ध्वजाखाली आपला राष्ट्रीय तिरंगा फडकावणे हा राष्ट्रीय सन्मानाचा अपमान मानला जातो. संबंधित कृत्याबद्दल नागरिकांकडून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश मधेही असाच प्रकार उघडकीस आला. कुशीनगर येथे एका युवकाने आपल्या घरी चक्क पाकिस्तानी झेंडा फडवला. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले असून, पाकिस्तानी झेंडा खाली उतरवण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com