Babush Monserrate: कोर्टाने खडसावल्यानंतर सीबीआयला जाग; बाबूश विरोधातील तक्रारीची प्रत सादर

Babush Monserrate: न्यायालयाने या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 डिसेंबरला ठेवली आहे.
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

Babush Monserrate: पणजी पोलिस स्थानकावरील हल्लाप्रकरणी मागील सुनावणीवेळी जिल्हा व सत्र न्यायालयाने फटकारल्यानंतर काल केंद्रीय अन्वेषण विभागाने सीबीआय (CBI) तक्रारीची मूळ प्रत सादर केली. या प्रकरणातील पणजी पोलिस स्थानकाचे तपास अधिकारी तुषार लोटलीकर यांची जबानी तसेच उलटतपासणी सुरू होणार आहे. ही सुनावणी आता न्यायालयाने येत्या 6 डिसेंबरला ठेवली आहे.

सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्रावरील सुनावणी पणजीच्या प्रधान सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शेरील पॉल यांच्यासमोर सुरू आहे. पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांची जबानी नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती ती पूर्ण झाली. या सुनावणीवेळी मंत्री बाबुश मोन्सेरात व आमदार जेनिफर मोन्सेरात तसेच माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज व रॉडनी गुदिन्हो हे वगळता इतर सर्व संशयित आज न्यायालयात उपस्थित होते.

Babush Monserrate
Goa Mineral Auction: खनिज ब्लॉक्ससाठी JSW; किर्लोस्करसह 11 कंपन्या शर्यतीत, 15 डिसेंबरपासून प्रत्यक्ष लिलाव

टोनी रॉड्रिग्ज व रोडनी गुदिन्हो यांची न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी ओळख पटविली नसल्याने ती आता पुढील सुनावणीवेळी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, मागील सुनावणीवेळी न्यायालयाने सीबीआयला तक्रारीची मूळ प्रत सादर करण्यास सांगितले, तेव्हा त्यांच्याकडे ती प्रत नव्हती.

त्याच्या बदली त्या तक्रारीची नक्कल प्रत सादर करण्यात आल्याने न्यायालयाने सीबीआय तपास अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. ही मूळ प्रत सादर न केल्यास या खटल्यावरील सुनावणीच बंद केली जाईल असा इशारा दिला होता.

तपास अधिकाऱ्याची जबानी नोंद

पोलिस स्थानकावरील हल्ल्यावेळी पोलिस तसेच खासगी वाहनांची तोडफोड संशयितांनी केली त्या वाहनांची माहिती प्रथम तपास अधिकारी लोटलीकर यांनी आज न्यायालयात दिली. पोलिस स्थानकावर करण्यात आलेल्या या हल्ल्यात सुमारे 24 पोलिस जखमी झाले. त्यामध्ये काहीजण गंभीर जखमी झाल्याचे न्यायालयाला जबानीत सांगितले. त्यांची जबानी पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याने त्यानंतर त्यांच्या उलटतपासणीला सुरवात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com