धोका वाढला; कोविड तज्ज्ञ समितीची होणार महत्त्वाची बैठक

गोव्यात सक्रिय कोरोना रुग्णांची सख्या 274, नवे 30 रुग्ण सापडले
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात वाढत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने कोरोना संबंधीच्या तज्ज्ञ समितीची बैठक 9 जून रोजी आयोजित केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर असणार आहेत.

यासंबंधीची माहिती डॉ. बांदेकर यांनी सर्व सदस्यांना दिली असून ही बैठक बुधवारी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या बैठकीत राज्यात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि पॉझिटिव्हिटी रेट याबाबत चर्चा होणार असून कोरोना संबंधीचे नियम आणि करावे लागणाऱ्या उपाययोजनांची चर्चा होणार आहे.

Goa Corona Update
मॉन्सूनचा प्रथमच कारवारमध्ये मोठा मुक्काम

दरम्यान, राज्यात सोमवारी कोरोनाचे नवे 30 रुग्ण सापडले असून संक्रमणाचा दर 5.73 टक्के इतका झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 274 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 46 हजार 53 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 947 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.33 टक्के इतके आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com