Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; नवे 112 रुग्ण

संक्रमण दरही वाढून पोहोचला 9.14 टक्क्यांवर
Published on

पणजी : देशभर वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या 112 झाली आहे, तर संक्रमण दरही (पॉझिटिव्हिटी रेट) वाढून 9.14 टक्के इतका झाला आहे.

याशिवाय सक्रिय रुग्णांची संख्या 614 झाल्याने नागरिकांनी कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 46 हजार 806 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 42 हजार 356 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.20 टक्के इतके आहे.

Goa Corona Update
तुये येथील रुग्णालय बनले गुरांचा गोठा

गेल्या 24 तासांत कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नसल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 833 आहे. काल दिवसभर 1225 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या, त्यापैकी 112 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com