

पणजी : राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गीत व्यक्ती सापडू लागल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आज दिवसभरामध्ये पुन्हा एकदा तीन ‘कोरोना’बाधित रुग्णांचे निधन झाले. त्यामुळे कोरोना संसर्गित रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही.
आरोग्य खात्याने काल (बुधवारी) दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात 1901 कोरोना तपासणी (शॅंपल्स) करण्यात आली. त्यामध्ये 133 नवे कोरोना संसर्गित रुग्ण सापडले. गेले सलग चार दिवस 100 पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोना तपासणीचे प्रमाण वाढल्यामुळे हे रुग्ण वाढल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.
दिवसभरामध्ये 58 कोरोनाबाधित बरे झाले व तिघा कोरोना बाधितांचे मृत्यू झाल्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 821 वर पोचली आहे. आजच्या दिवशी राज्यात कोरोनावर उपचार घेणारे 1089 रुग्ण असून आतापर्यंत 54981 कोरोनाबाधित व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे टक्केवारी 96.63 टक्के एवढी झालेले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.