Health care: गोवेकरांनो सावधान! कोरोना वाढतोय, 'अशी' घ्या काळजी...

Health care: उत्सवांच्या हंगामात संसर्गाचा धोका
Health Care
Health CareDainik Gomantak

Health care: हिवाळ्यात अनेक आजारांचा वेगाने प्रसार आपल्याला दिसतोय. त्यातच सध्या कोरोनाने डोकं वर काढलाय. गोव्यात काल शनिवारी म्हणजेच 23 डिसेंबरला 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय.

गोव्यात काही दिवसांपूर्वी जेएन 01 व्हेरिएंटचे 19 रुग्ण आढळून आले होते. केरळनंतर गोव्यात आढळून आलेल्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र, सर्व रुग्ण ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले होते.

असं असलं तरी या सीझनमध्ये ख्रिसमस, नववर्षासारखे उत्सव साजरे करताना प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक आहे.

मोठ्या व्यक्तींसोबतच लहान मुलांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. सध्या थंडीच्या दिवसांत लहान मुलांमध्ये वेगाने पसरणारा आजार म्हणजे न्यूमोनिया. लहान मुलांप्रमाणे अशक्त, वृद्ध माणसांमध्येही हा आजार बळावल्याचं दिसतंय.

Health Care
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात इंधनाच्या किमती घटल्या; जाणून घ्या 24 डिसेंबरचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

न्यूमोनियाच्या संसर्गामध्ये एक किंवा दोन्ही फुफ्फुसांच्या हवेच्या पिशव्या सुजतात. या हवेच्या पिशव्या फुफ्फुसात आढळतात. त्यामुळे फुफ्फुसांना हवा पास होण्यास मदत होते.

या हवेच्या पिशव्यांमध्ये होणाऱ्या संसर्गाला सामान्यतः न्यूमोनिया म्हणतात. या संसर्गामध्ये रुग्णाला खोकला, थरथरणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो आणि नंतर हवेच्या पिशव्या पाण्याने भरतात आणि यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते.

अशी' घ्या काळजी... :-

खराब प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना कोरोना, न्यूमोनिया स्टख्या आहाराची चटकन लागण होते असे निरीक्षणावरून सिद्ध झालय. लसीकरणाद्वारे न्यूमोनिया टाळता येऊ शकतो. मात्र कोरोनासाठी खबरदारी घेणंच योग्य ठरेल.

(1) हवामानाच्या बदलणे आपले आरोग्य कसे सुदृढ राहील याकडे लक्ष द्या.

(2) नियमित योगा, व्यायाम करण्यावर भर द्या.

(3) पहाटे उठून प्राणायाम करा, यामुळे फुफ्फुसांची ताकद वाढते. श्वसननलिका मोकळी होते. सर्दीचा त्रास असेल तर तोही कमी होतो. मात्र यासाठी सातत्य हवं.

(4) रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्वे आणि पाचक घटकांची शरीराला आवश्यकता असते. त्यामुळे दैनंदिन आहारातून ती कशी जास्त प्रमाणात मिळतील याकडे लक्ष द्या.

(5) अन्नपदार्थांमध्ये लसूण, आले, आवळा, दालचिनी, सुंठ, धणे, जिरे, ओवा, ज्येष्ठ मध, कापूर, हिंग, पपई, डाळिंब, तुळस,हळद, गूळवेल, मोहरी या अन्नपदार्थांचा समावेश योग्यरीत्या योग्य मात्रेत करा.

(6) या सर्व उपायांसोबतच आपले मानसिक आरोग्य कसे निरोगी आणि सुदृढ राहील यासाठी प्रयत्न करणंही तितकंच आवश्यक असेल. आयुष्याकडे बघताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. एखाद्या वाईट घटनेमधूनही काहीतरी चांगलं घडत यावर विश्वास ठेवणंही गरजेचं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com