Corjuem Cable Bridge : खोर्जुवे - हळदोणे ‘केबल ब्रिज’च्या दुरुस्तीचे काम संथगतीने

Corjuem Cable Bridge : कामात अडचण काय? ः स्थानिक नागरिकांचा सवाल, देखभालीच्या कामात वारंवार पडतो खंड
Corjuem Cable Bridge
Corjuem Cable Bridge Dainik Gomantak

Corjuem Cable Bridge :

बार्देश तालुक्यातील हळदोणा मतदारसंघात येणाऱ्या खोर्जूवे हळदोणे केबल ब्रिजच्या देखभालीचे काम गेले काही महिन्यांपासून सुरू आहे.

पण त्या ब्रिजचे काम मंद गतीने सुरू असून काही दिवस काम करतात तर मधेच ते काम थांबविले जाते. त्यामुळे काम रखडत असल्याने स्थानिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेले काही महिने ब्रिजचे रंगकाम काम सुरू होते, पण ऐन पावसाळा तोंडावर आला तरीही हे काम पूर्ण झालेले नाही. ब्रिजच्या फॅब्रिकेशन चे काम अत्यंत दुरावस्थेत असल्यामुळे स्थानिक आमदारांनी व सरकारने त्वरित त्याकडे लक्ष द्यावे, असे नागरिकांचे मत आहे.

Corjuem Cable Bridge
Goa: विनाहात पायाचे मूल जन्माला येईल, 15 वर्षापूर्वी डॉक्टर म्हणाले होते पुन्हा विचार करा; पण मुलाने चमत्कार केला

ब्रिजच्या सुरक्षेसाठी लावलेल्या लोखंडी पाईप काही ठिकाणी निखळून कोसळल्या आहेत.

खोर्जुवे हळदोणा नदीवर हा केबल ब्रिज ३० मे २००३ रोजी उभारण्यात आला होता. त्याचे उदघाटन तत्कालीन केंद्रीय वाहतूक मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर, तत्कालीन वीजमंत्री दिगंबर कामत, तत्कालीन बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, तत्कालीन हळदोणा आमदार ॲड.दयानंद नार्वेकर, तत्कालीन गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळचे चेअरमन विजय पै खोत, माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर, माजी सरपंच प्रेमानंद प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

स्थानिकांच्या व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या ब्रिजची दुरुस्ती तातडीने करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मध्ये जाऊन काही नागरिकांनी याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असता संबंधित अधिकाऱ्यांची उत्तर देखील उडवाउडवीची होती. त्यामुळे या ब्रिजचे काम लवकरात लवकर व्हावे याकरिता स्थानिक आमदार यांनी जातीने लक्ष घालावे.

- देविदास पणजीकर, हळदोणा

Corjuem Cable Bridge
Goa: विनाहात पायाचे मूल जन्माला येईल, 15 वर्षापूर्वी डॉक्टर म्हणाले होते पुन्हा विचार करा; पण मुलाने चमत्कार केला

लोखंडी पाईप गंजलेल्या

कालांतराने या केबल ब्रिजची निगा योग्यरित्या न ठेवल्याने या ठिकाणचे लोखंडी पाईप गंजून गेले आहेत. तर या ठिकाणी रंगरंगोटी न केल्याने हा ब्रिज एकदम खराब झालेला आहे.स्थानिक व परराज्यातील पर्यटकही येथे येऊन या पुलाला भेट देतात व बाहेरील राज्यातील पर्यटक हा पूल चांगला असल्याने येथे पिकनिक व शूटिंगसाठी येत असतात.

गेल्या काही महिन्यांपूर्वी या केबल ब्रिजचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु हे काम सध्या बंद असल्याने येथे लोकांमध्ये व ब्रिजवरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com