Ferry Boat Fare: फेरीबोट शुल्कवाढसंदर्भात काँग्रेसचा भाजपावर निशाणा

सरकारला लागलेत भिकेचे डोहाळे म्हणतात साधला निशाणा
Ferry Boat Fare
Ferry Boat FareDainik Gomantak
Published on
Updated on

Ferry Boat Fare: फेरीबोटीतून ये-जा करणार्‍या दुचाकींना दहा रुपये व चारचाकींसाठी झालेली संभाव्य तिकीट दरवाढ करण्याचा निर्णयाचा काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच, पाच-दहा रुपये लोकांकडून वसूल करण्याची वेळ सरकारवर आल्याने भाजपा सरकारला भिकेचे डोहाळे लागलेत का?

असा सवाल करीत येत्या १६ तारखेपर्यंत हा प्रस्ताव सरकारने मागे न घेतल्यास काँग्रेसकडून नदी परिवहन खात्यावर धडक मोर्चा दिला जाईल, असा सज्जड इशारा उत्तर गोवा काँग्रेस जिल्हा समितीने दिला.

Ferry Boat Fare
Mapusa Accident: शेळपे येथे सिलिंडरवाहू टेम्पोचा अपघात; थोडक्यासाठी बचावला ड्रायव्हरचा जीव

मंगळवारी (ता.७), म्हापशातील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस प्रदेश सरचिटणीस विजय भिके, उत्तर जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, अ‍ॅड. अतुल नाईक, संजय बर्डे व इतर पदाधिकारी हे उपस्थित होते.

विजय भिके म्हणाले की, मुळात भाजपा हे सर्वसामान्यांचे सरकार नाही. भाजपाच्या काळात महागाईने उच्चांक गाठला असून, इंधनपासून पेट्रोलच्या दरामुळे लोकांचे कबंरडे मोडले आहे. यातच, सरकारने आता वाहतूक सेवेचा दुवा असलेल्या पारंपरिक फेरीबोट शुल्कवाढ करण्याचा संभाव्य निर्णय घेतलाय. मुळात सरकारला भिक लागल्यानेच आता फेरीबोट शुल्कवाढच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्यांची पिळवणूक करण्याचे योजिले आहे, अशी टीका त्यांनी केली.

मुळात सरकारला करदात्यांच्या पैशांतून फक्त इव्हेंट साजरे करायचे आहेत. सरकारने फेरीबोट शुल्कवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही आणि सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशारा त्यांनी दिला.

विरेंद्र शिरोडकर म्हणाले की, महागाईवर अंकुश आणण्यापासून लोकांना नवीन रोजगार उपलब्ध देण्यात भाजपा सरकारला अपयश आले आहे. त्यातच, आता फेरीबोट शुल्कवाढ करुन सरकार सामान्यांवर आणखी आर्थिक ओझे लादण्याचा प्रयत्न करते. याआधीच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारला इशारा दिला की, १६ नोव्हेंबरपर्यंत हा प्रस्ताव मागे न घेतल्यास काँग्रेस पूर्ण ताकदीने नदी परिवहन खात्यावर धडक देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅड. अतुल नाईक म्हणाले की, फेरीबोट हे सर्वसामान्यांचे वाहतूकीचे मोफत साधन आहे. जरी पाच-दहा रुपये सरकारला शुल्क म्हणून कमी वाटत असले तरी सर्वसामान्यांसाठी हा दर मोठा आहे. जनतेस ही दरवाढ परवडणारी नाही. कारण, गरीब जनता या फेरीबोट सेवेचा वापर करतात. हा प्रस्ताव मागे घेण्यातच लोकांचे कल्याण असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com