Mapusa Accident: शेळपे येथे सिलिंडरवाहू टेम्पोचा अपघात; थोडक्यासाठी बचावला ड्रायव्हरचा जीव

ही घटना दुपारी १.३०च्या सुमारास घडली
Mapusa Accident
Mapusa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Accident: सेंट जेरोमवाडो, शेळपे म्हापसा येथे उतारावर सिलिंडरवाहू टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या बाजूला नेल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Mapusa Accident
Onion Prices: खूशखबर! गोव्यात कांद्याचे दर दहा रुपयांनी उतरले...

यावेळी वरील गाडीत (जीए ०३ एन ०९४२) ७० पेक्षा अधिक भरलेले गॅस सिलिंडर होते. गॅसवाहू गाडी येथील वाड्यावर सिलिंडर घरपोच करण्यासाठी आलेली. ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन रस्त्याबाजूला असलेल्या एका घराच्या संरक्षक भिंतीच्या दिशेने नेऊन गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला आणि या अपघातानंतर गाडी स्थिरावली.

ही घटना मंगळवारी (ता.७) दुपारी १.३०च्या सुमारास घडली. या अपघातग्रस्त गॅसवाहू गाडीतील सिलिंडर खाली करून माल दुसऱ्या गाडीत भरण्यात आला. आणि नंतर क्रेनच्या सहाय्याने सदर वाहन बाजूला करण्यात आले. म्हापसा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला.

दरम्यान, अशीच एक घटना आज सकाळीही घडली. म्हापसावरून शिवोलीच्या दिशेला जाणाऱ्या टेम्पोचा मार्ना येथील उतारावर ब्रेक फेल झाल्याने टेम्पो कंपाऊंड तोडून कलंडला. टेम्पो जरा पुढे गेला असता तर तो सरळ एका घरात घुसला असता.

दरम्यान, प्रसंगावधान राखून चालत्या वाहनातून उडी मारल्याने ड्रायव्हरचा जीव वाचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com