Goa: कॉंग्रेस नेतृत्व बदलाच्या प्रतीक्षेत

अन्य पक्षांशी आघाडी (Alliance) करण्यास राहुल गांधींची (Rahul Gandhi) सहमती (Goa)
Goa Congress Leaders Visit Delhi
Goa Congress Leaders Visit DelhiDainik Gomantak

पणजी : कॉंग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीपूर्वी (Goa) प्रदेशाध्यक्ष बदलणार का (Congress Leader) आणि अन्य पक्षांशी आघाडी करणार का, याकडे राज्यातील कॉंग्रेस नेते (Congress Workers) तसेच कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अन्य पक्षांशी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी (Alliance) करण्यासंदर्भात गुरुवारी एकास एक पद्धतीने केलेल्या चर्चेवेळी सहमती दर्शवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. कॉंग्रेसने आघाडी केल्यास भाजपविरोधी मते फुटणार नाहीत आणि त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, (Digambar Kamat) आमदार लुईझिन फालेरो, (Luizinho Falero) खासदार फ्रांसिस सार्दिन (Francisco Sardinh) आदींनी गांधी यांना सांगितल्याचे समजते. मात्र, उघडपणे काय चर्चा झाली ते सांगण्यास त्यांच्याकडून नकार देण्यात आला. खात्रीलायकरित्या मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारच्या चर्चेत सहभागी एका नेत्याने अन्य पक्षाच्या नेत्याशी बोलताना आघाडी होऊ शकते, असे नमूद केले आहे. यामुळे आघाडीसाठी कॉंग्रेस दरवाजे उघडेल, असे दिसते.

Goa Congress Leaders Visit Delhi
Goa: चोर्ला घाटात अखेर बारा तासानंतर वाहतूक सुरळीत

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांना पक्षाच्या भल्यासाठी हटवावे लागेल, असा आग्रही मुद्दा सार्दिन यांनी मांडला, तेव्हा गांधी यांनी याला पर्याय काय, अशी विचारणा केली. गांधी यांनी लुईझिन फालेरो यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारता का? असे विचारल्यावर मागील निवडणुकीत आपण १७ जागा कशा निवडून आणल्या, पुढे काय झाले, याची संक्षिप्त माहिती फालेरो यांनी गांधी यांना दिली. आपण आता दिल्लीतच बरा आहे, असे हसतच फालेरो यांनी सांगितले. पक्षाची बलस्थाने, आघाडी राजकारण, भाजपची संभाव्य युती, आम आदमी पक्षाचा (Aam Aadmi Party) चंचुप्रवेश आदींबाबत कामत यांनी गांधी यांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. कामत व खलप दिल्लीतच थांबले असून बाकी सारे गोव्यात परतले आहेत. माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप (Ramakant Khalap) म्हणाले, पक्षाने उमेदवारी देताना नवोदित व अनुभवी उमेदवारांना योग्य न्याय द्यावा. सगळेच नवे चेहरे विधानसभेत पाठवले तर प्रशासन चालवताना अडचणी येतील. त्यासाठी नवोदितांसोबत अनुभवींनाही संधी देणे योग्य ठरेल, असे गांधी यांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संघटनात्मक बाबी हाताळताना संघटनेत साचलेपण येऊ देऊ नका. आम्हाला सर्व परिस्थितीचे गांभीर्य आहे, असा संदेश जनतेपर्यंत जाण्यासाठी जी पावले उचलायची असतील ती उचलावीत, अशी विनंतीही गांधी यांना केली आहे.

Goa Congress Leaders Visit Delhi
Goa:आगरवाडा येथील चार हेक्टर भातशेती पाण्याखाली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com