Goa Congress : काँग्रेसमुळेच राज्‍याच्‍या विकासाला बसली खीळ; फळदेसाईंचा आरोप

Goa Congress : उलट भाजपने साधलाय गोव्‍याचा सर्वांगीण विकास
Goa Congress
Goa Congress Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, राज्याच्या विकासात खीळ घालण्याचे काम काँग्रेस पक्षाकडून केले जातेय. विकासकामांना विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते निदर्शने करतात किंवा आंदोलकांना पाठिंबा देतात, असा आरोप समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

राज्याचा खऱ्या अर्थाने विकास २०१४ पासून होऊ लागला आहे. काँग्रेसच्या सर्व राजवटींत मिळून विकासकामांवर झालेला खर्च हा गेल्या केवळ १० वर्षांत खर्च झालेल्या रकमेच्या केवळ २५ टक्के आहे. राज्याचा विकास झालेला काँग्रेसला बघवत नाही, असे फळदेसाई म्‍हणाले. रस्ते, जलमार्ग, हवाईमार्ग यांचा विकास भाजपनेच केला आहे. झुआरी नदीवर काँग्रेस पक्ष कित्येक वर्षे पूल बांधू शकला नाही, असेही ते म्‍हणाले.

या पत्रकार परिषदेला प्रवक्ते ॲड. यतीश नाईक व माध्यम विभाग प्रभारी प्रेमानंद म्हांबरे उपस्थित होते.

मोदी त्‍यांच्‍या पचनी पडत नाहीत : यतीश नाईक

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचे त्यांच्या पचनी पडत नाही. राज्यघटना संकटात आहे असा खोटा प्रचार करणाऱ्या काँग्रेसनेच जनतेवर आणीबाणी लादली. २४० पत्रकारांसह लाखो लोकांना तुरुंगात डांबले. नागरीस्वातंत्र्याचा संकोच काँग्रेसनेच केला होता, असे प्रवक्ते ॲड. यतीश नाईक यांनी सांगितले.

Goa Congress
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आंदोलन; रस्त्यावरच भरवली शाळा!

प्लायओव्हर बघण्यासाठी आम्हाला आधी मुंबईत जावे लागायचे. आता गोव्यातच फ्लायओव्हरचे जाळे विणले गेले आहे. राज्यघटना संकटात आहे असा काँग्रेसचा पोकळ आरोप आहे. राज्यघटनेत सर्वाधिक बदल हे काँग्रेसने केले तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटना बदलण्याचा कोणताही विचार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे.

- सुभाष फळदेसाई, समाजकल्याणमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com