Goa : अनियोजित विकासामुळे ताळगावचे काँक्रिटीकरण

Goa : बेसुमार बांधकामांमुळे सुविधांवर ताण : शेतजमिनींचे रुपांतर करून टोलेजंग इमारती
Goa : Concreting has been increased by converting the land in Taligao Goa.
Goa : Concreting has been increased by converting the land in Taligao Goa.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राजधानी पणजीला टेकून असलेल्या ताळगाव मतदारसंघात (Taligao Constituency) विविध समस्यांनी लोक बेजार आहेत. अनियोजित बांधकामांनी (Unplanned Construction) व्यापल्याने मतदारसंघातील सुविधांवर ताण आला आहे. त्याचा परिणाम पावलोपावली जाणवत आहे. ताळगाव मतदारसंघात गेल्या दोन दशकांत टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने ताळगाववासीयांच्या मूलभूत गरजांवर निर्बंध आले आहेत. पाणी, कचरा, सांडपाणी निचरा या मुख्य समस्यांसह मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे. अनेक शेतजमिनींचे रुपांतर बिगर शेतजमिनीत करून या मतदारसंघात काँक्रिटीकरण होत आहे. ताळगावात नियोजनबद्ध विकास झालाच नाही.

Goa : Concreting has been increased by converting the land in Taligao Goa.
Goa: वेळगे शैक्षणिक संस्थेत भाऊसाहेबांची पुण्यतिथी साजरी

राजधानी पणजी शहराला लागून असलेला ताळगाव मतदारसंघ हा एकमेव असा मतदारसंघ आहे, ज्यामध्ये फक्त एकच ताळगाव पंचायतीचा समावेश आहे. असे असले तरी ही पंचायत महसूल मिळवण्यात राज्यात कळंगुटपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मतदारसंघात गेल्या काही दशकात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी राहिली आहेत. पणजीच्या जवळ असल्याने बिल्डरांचे लक्ष या मतदारसंघावर गेले आणि अनेकांची घरे खरेदी करून त्यावर टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघ हा ग्रामीण राहिला नसून त्याचे शहरीकरण झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात असलेल्या मतदारांपेक्षा अधिक लोक राहतात. यातून पाणी, वीज तसेच सांडपाणी निचरा समस्या अधिक वाढली आहे. पूर्वी पाणी व वीज पुरवठा होत होता त्यात किंचित वाढ केली असली, तरी या मतदारसंघाच्या अंतर्गत भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. मतदारसंघात एकमेव पाण्याची टाकी आहे व त्यानंतर दुसरी टाकी बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे घरे असलेल्या मतदारांना पाण्याच्या टँकरची मदत घ्यावी लागते.

वीस वर्षे लोटली, तरीही
आश्‍वासनपूर्ती नाहीच!

मतदारसंघातील सांपॉल येथे जुन्या पडक्या जागेत बाजारपेठ आहे. या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदारांनी ताळगाववासियांना सॅटेलाईट मार्केट, आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस, मासळी मार्केट अशा सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा आराखडाही तयार करण्यात आला होता. मात्र २० वर्षे उलटून गेली तरी ते अजूनही पूर्ण झालेले नाही. आरोग्य केंद्रही ताळगावात नाही. लोकांना पणजी आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. महसुलात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ताळगाव पंचायतीचे स्वतःचे पंचायत घर नाही. सध्या त्यासाठी ताळगाव कम्युनिटी सेंटरच्या बाजूलाच शेतजमीन पुरवून तेथे पंचायत घर उभारण्यात येत आहे, मात्र त्याला शेतमालकांचा विरोध आहे. राजकारण्यांच्या दबावामुळे कोणी काही तोंड उघडत नाहीत.

Goa : Concreting has been increased by converting the land in Taligao Goa.
Goa:समर्पित, सेवाभावी ‘सर्पमित्र’ : प्रदीप गवंडळकर

कचऱ्याला समस्‍यांची दुर्गंधी
ताळगाव पठार येथे कचरा वर्गीकरणाचा प्रकल्प उभारण्यात आला, तरी कचरा समस्या अजूनही कायम आहे. घरोघरी कचरा जमा करण्यावर भर दिला जात नाही. मतदारसंघातील काही प्रभागांमध्येच अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे वाड्यांवरील भाग हा ग्रामीणच राहिला आहे. ताळगावात रोजगार मिळण्यासाठी कोणतेही उद्योग नसल्याने रोजगाराची समस्या मोठी आहे. त्यामुळे युवा पिढीसमोर सरकारी नोकरी किंवा एखाद्या खासगी आस्थापनाशिवाय पर्याय नाही.

सांडपाणी निचरा जोडण्या प्रतीक्षेत
गेल्या कित्येक वर्षांपासून मतदारसंघात सांडपाणी निचऱ्याची समस्या मोठी आहे. पाच वर्षांपूर्वी त्याची पाईपलाईन व टाक्या बांधून तयार आहेत, मात्र त्याच्या जोडण्या देण्यात आलेल्या नाहीत. ताळगावात शेतजमिनीत या सांडपाणी निचरा टाक्यांचे बांधकाम रेंगाळले होते ते गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेले असले तरी त्याला गती नाही. त्यामुळे ही समस्या कधी सुटणार या प्रतीक्षेत ताळगाववासीय आहेत.

विकासाचा फायदा बिल्डर्सना
मतदारसंघात विकास झाला असला, तरी स्थानिकांना त्याचा फायदा झालेला नाही. त्याचा फायदा बिल्डर लॉबीला झाला. त्यांच्यासाठीच मतदारसंघात नवे रस्ते करण्यात आले, पण या मतदारसंघातील विविध वाड्यांवर असलेल्या रस्त्यांची सुधारणा झाली नाही. सांतिनेझ ते सांपॉलपर्यंत आमदारांच्या बंगल्यापर्यंत बगल रस्ता झाल्यापासून ताळगावातील अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.

कामराभाट ३० वर्षे ‘जैसे थे’च
या मतदारसंघात कामराभाट हा परिसर दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो. या ठिकाणी झोपडपट्टी आहे. त्या ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण होते. या मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदारांनी निवडणुकीवेळी त्यांना पक्की घरे देण्याचे वारंवार गेली ३० वर्षे वचन दिले. मात्र, अजूनही त्यांना त्याच परिस्थितीत दिवस काढावे लागत आहेत. हा परिसर झोपडपट्टीचा असल्याने तेथे अस्वच्छता व गलिच्छपणा आहे. या परिसरात सांतिनेझ नाला असल्याने तो पावसाळ्यात भरतो व त्याचे पाणी या कामराभाट परिसरात येऊन त्या वस्तीतील झोपडवासीयांचे मोठे नुकसान होते. ही दरवर्षीची कहाणी आहे. त्याकडे दुर्लक्षच होत आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com