गोव्यात निवडणुकीच्या तयारीला वेग! 91 टक्क्यांहून अधिक मतदारांची गणना पूर्ण; सीईओ संजय गोयल यांचा खुलासा

SIR enumeration Goa: गोव्यात ९१ टक्क्यांहून अधिक गणनेचे फॉर्म गोळा करून त्यांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे
Goa voter list update
Goa voter list updateDainik Gomantak
Published on
Updated on

SIR enumeration progress Goa: गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी आयएएस संजय गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिपोर्ट प्रक्रियेमध्ये मतदारांच्या गणनेचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. गोव्यात ९१ टक्क्यांहून अधिक गणनेचे फॉर्म गोळा करून त्यांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे.

आकडेवारी आणि वेळापत्रक

निवडणूक आयोगाच्या (ECI) सुधारित वेळापत्रकानुसार (३० नोव्हेंबर २०२५), गोव्याने सर्व पात्र मतदारांची गणना पूर्ण केली. गोव्यात एकूण ११,८५,०३४ मतदार आहेत, त्यापैकी १०,८४,९५६ गणनेचे फॉर्म गोळा करण्यात आले असून, हे प्रमाण ९१.५५ टक्के झालेय.

Goa voter list update
90 हजार मतदारांना वगळणार! SIR साठी गोव्यासह 12 राज्यांना मुदतवाढ; 96.05% मतदारांकडून अर्ज जमा; आयोगाची माहिती

मसुदा यादी आणि हरकतींची प्रक्रिया

गोव्याची मसुदा मतदार यादी (Draft Electoral Roll) १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, मतदार १६ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या दरम्यान हरकती आणि दावे दाखल करता येतील.

मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल म्हणाले की, १६ डिसेंबर पासून निवडणूक नोंदणी अधिकारी (EROs) आणि सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी (AEROs) असमाविष्ट (unmapped) मतदारांना नोटिसा जारी करतील. अधिकारी निर्धारित कालावधीत सुनावणी करतील, प्रकरणांची तपासणी करतील आणि दावे तसेच हरकतींवर निर्णय घेतील.

दावे आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गोव्याची अंतिम मतदार यादी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती गोयल यांनी दिली. भविष्यातील निवडणुकांपूर्वी अचूक आणि सर्वसमावेशक मतदार यादी सुनिश्चित करण्यासाठी, निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांना आवाहन केले आहे की त्यांनी मसुदा यादीतील त्यांचे तपशील तपासावेत आणि दिलेल्या वेळेत कोणत्याही चुका किंवा हरकती असल्यास त्या नोंदवाव्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com