Colvale Mobile Tower: ...तर तीव्र आंदोलन छेडणार, कोलवाळ येथे प्रस्तावित मोबाईल टॉवरला स्थानिकांचा तीव्र विरोध; ग्रामस्थ एकवटले

Colvale Mobile Tower Protest: कोलवाळ येथील रहिवाशांनी सरपंच रितेश वारखंडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन मोबाईल टॉवरला तीव्र विरोध दर्शविला.
Colvale Mobile Tower
Colvale Mobile TowerDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कोलवाळ येथील रहिवाशांनी सरपंच रितेश वारखंडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन मोबाईल टॉवरला तीव्र विरोध दर्शविला. गावात आधीच पुरेसे टॉवर असून, आणखी एका नवीन टॉवरची अजिबात गरज नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

नागरी वस्ती आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ या टॉवरची उभारणी केली जात असल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली. तसेच संबंधित प्रशासनाने या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली.

Colvale Mobile Tower
Goa Section 39A: कलम '39-अ' रद्द करा, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन; 'टीसीपी'ला 'इनफ्‌'चा अल्टिमेटम!

यासंदर्भात सरपंच रितेश वारखंडकर म्हणाले की, या प्रस्तावापूर्वी स्थानिक जनता किंवा प्रशासनाला विश्वासात घेतले गेले नाही. मतदारसंघात आधीच सुमारे १० मोबाईल टॉवर आहेत. या भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे लोकांना न विचारता आणखी एक टॉवर उभारण्यास आमचा ठाम विरोध आहे.

विशेष म्हणजे, ज्या जागेवर नवीन टॉवर प्रस्तावित आहे, तिथून अवघ्या एक मीटर अंतरावर आधीच एक टॉवर उभा आहे. नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, ते चांगल्या मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या (संपर्क यंत्रणा) बाजूने आहेत; परंतु अशा पायाभूत सुविधांची उभारणी स्थानिक जनतेशी चर्चा करून आणि गरजेची योग्य तपासणी केल्यानंतरच केली पाहिजे.

Colvale Mobile Tower
'Goa Bird Checklist'मध्ये नव्या प्रजातींची नोंद; पाच नव्या पक्ष्यांचा समावेश, इंडियन बड्‌र्सच्या शोधपत्रिकेतील अहवाल प्रसिद्ध

...तर तीव्र आंदोलन छेडणार

रहिवाशांनी यावेळी इशारा दिला आहे की, त्यांच्या विरोधानंतरही हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या प्रकरणात राज्य सरकार आणि स्थानिक आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी त्वरित हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com