

पणजी: राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांना विलंब व्हावा यासाठी सरकारातील काही घटकांकडून प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर दबाव आणला जात असून, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप ‘एनएसयूआय’चे समन्वयक कुमार गवळी यांनी केला. ते कॉंग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
गवळी म्हणाले की, सरकारला हस्तक्षेप करायचाच असेल तर राज्यातील शैक्षणिक साधनसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात अभाव आहे, त्यात हस्तक्षेप करून बदल घडावावा. महाविद्यालयीन निवडणुकांसाठी नामांकन पात्रतेच्या नियमांनुसार अपात्र ठरणाऱ्या बॅकलॉग विद्यार्थ्यांचेही नामांकन स्वीकारण्यात आले आहे; परंतु नियमांचे पालन करत आणि गुणवत्तेच्या आधारावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर मात्र अन्याय होत आहे.
राज्यातील महाविद्यालयांमधील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, अशी मागणी ‘एनएसयूआय’ने केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे हा मुद्दा मांडला असल्याचेही गवळी यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.