Goa: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; रेवल्युशनरी गोवन्सने केली मागणी
पणजी: महिला आणि मुलींवर झालेल्या अत्याचाराबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या मुखमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी रेवल्युशनरी गोवन्सच्या (Revolutionary Govans) सुनैणा गावडे (Sunaina Gawde) यांनी केली आहे. पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत तन्वी देऊसकर (Tanvi Deoskar) आयदा रोड्रिग्स आणि गौरीता पडोलकर उपस्थित होत्या. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. गोव्याची शांतताप्रिय ही ओळख बदलत असून त्याला हे लोकप्रतिनिधी खतपाणी घालत आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.
गेल्या दोन दिवसंपासून महिला आणि मुलींवरील अत्याचाराचा मुद्दा राज्यात गाजत आहे. सर्वच महिला संघटना मुख्यमंत्रांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत आहेत. आज रेवल्युशनरी गोवन्सच्या सुनैणा गावडे यांनीही निषेध नोंदवत, गोवा कधी सुरक्षित होणार? रात्रीच्या वेळी मुलींनी घराबाहेर पडणे गुन्हा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.