गोवा सरकारमध्ये अंदाधुंदी, धार्मिक सलोखा धोक्यात; विजय सरदेसाईंनी पर्यटनाबाबत व्यक्त केली चिंता

Goa Politics: मुख्यमंत्री व नंबर दोन क्रमांकावरील मंत्र्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी भाजपच्या पक्ष श्रेष्ठींना प्रयत्न करावे लागत असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.
गोवा सरकारमध्ये अंदाधुंदी, धार्मिक सलोखा धोक्यात; सरदेसाईंनी पर्यटनाबाबत व्यक्त केली चिंता
MLA Vijay SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सरकारमध्ये सध्या केवळ अंदाधुंदी चालली आहे. प्रशासन नावाची चीजच अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री व नंबर दोन क्रमांकावर असलेल्या मंत्र्यांमध्ये एकोपा नाही. त्यातच राज्यात धार्मिक सलोखा बिघडवण्याचे प्रकार सुरू आहेत.

त्याचा परिणाम पर्यटनावर होणार आहे, असे फातोर्डाचे आमदार व गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी आज (01 ऑक्टोबर) पत्रकारांकडे बोलताना सांगितले.

सध्या राज्यात जे चालले आहे, त्यावर सरकार काहीही निवेदन करीत नाही. मुख्यमंत्री व नंबर दोन क्रमांकावरील मंत्र्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी भाजपच्या पक्ष श्रेष्ठींना प्रयत्न करावे लागत असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.

आताच कुठे पर्यटन मोसमाला सुरवात झाली आहे व परिस्थिती अशीच राहिली तर पर्यटनावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट मत सरदेसाई यांनी मांडले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांना पक्ष श्रेष्ठींनी नवी दिल्लीत बोलावले, याबद्दल विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य केले.

गोवा सरकारमध्ये अंदाधुंदी, धार्मिक सलोखा धोक्यात; सरदेसाईंनी पर्यटनाबाबत व्यक्त केली चिंता
प्रमोद सावंत, विश्वजीत राणे यांच्यातील वाद शाहांच्या दरबारी! दिल्लीच्या बैठकीत नक्की काय घडलं?

दरम्यान, काणकोण येथील जुलूसबाबत हिंदू संघटनेने केलेल्या मागणीवरुन मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरत कारवाईची मागणी केली. म्हापसा, कुंकळ्ळी, डिचोलीत मुस्लिम नागरिकांनी निदर्शने केली. दुसरी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी राज्यातील रोजगाराबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

थेट मुख्यमंत्री सावंत देखील यामुळे नाराज झाल्याचे समजते. दोन्ही नेत्यांना हायकमांडने दिल्लीत बोलवून समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरुन विजय सरदेसाई यांनी आगामी पर्यटन हंगामाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com