जाहिरातबाज सरकार! CM प्रमोद सावंत यांनी तीन वर्षात जाहिरातींवर उधळले 'ऐवढे' कोटी रुपये

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर तीन वर्ष आणि या कार्यकाळातील एक असे एकूण चार वर्ष प्रमोद सावंत हे गोव्यातील मुख्यमंत्रीपद भूषवत आहे.
CM Pramod Sawant And Advertisement Expenditure
CM Pramod Sawant And Advertisement Expenditure Dainik Gomantak

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 24 एप्रिल रोजी 50 वा वाढदिवस साजरा केला. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर तीन वर्ष आणि या कार्यकाळातील एक असे एकूण चार वर्ष प्रमोद सावंत हे गोव्यातील मुख्यमंत्रीपद भूषवत आहे.

सावंत यांचे राज्य सरकारवर पूर्णपणे नियंत्रण असल्याचे त्यांनी वारंवार सिद्ध केले असले तरी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला वृत्तपत्र माध्यमांवरही सावंत यांनी पकड निर्माण केल्याचे दिसते. सावंत सरकारने गेल्या तीन वर्षांमध्ये गोव्यातील स्थानिक वृत्तपत्र, वृत्तवाहिनी आणि न्यूजपोर्टल्समधील जाहिरातींवर तब्बल 32 कोटी रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे.

'द वायर'ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केलंय. गोवा सरकारने एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2023 या काळात विविध वर्तमानपत्रे, टीव्ही, ऑनलाईन मिडियावर जाहिरातीपोटी तब्बल 32.68 कोटी रूपये खर्च केले आहेत. गोवा विधानसभेत 27 मार्च 2023 या काळात सादर केलेल्या कागदपत्रातून ही माहिती समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी विएगस यांनी याप्रकरणी प्रश्न विचारला होता.

'गोवा सरकारच्या योजना प्रसिद्ध करण्यासाठी कोणतीही एजन्सी कार्यरत नसून, सरकारच्या प्रसिद्धी विभागाच्या मार्फत (DIP) ते केले जाते,' असे सावंत यांनी उत्तर देताना म्हटले होते. दरम्यान, या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्री सावंत यांच्याकडेच आहे.

CM Pramod Sawant And Advertisement Expenditure
Yuri Alemao: गोवा पोलिस म्हणजे पाठिचा कणा नसलेला विभाग; विरोधी पक्षनेत्यांकडून घणाघात

राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रे, टीव्ही, ऑनलाईन मिडिया यांच्याशिवाय गोवा सरकारने भाजप आणि आरएसएस संबधित प्रकाशकांना देखील जाहीराती देण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध प्रकाशक संस्थांचा समावेश असून, त्या जाहिरातीपोटी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक वृत्तपत्रे आणि ऑनलाईन चॅनल यांना लाखो रूपयांच्या जाहिराती मिळत असताना प्रसार भारतीला केवळ 5,310 रूपयांच्या सरकारी जाहिराती मिळाल्या आहेत, असे या बातमीत म्हटले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे गोवा सारख्या लहान राज्यात केवळ ऑनलाईन समाज माध्यमांवर उपलब्ध असलेल्या संकेतस्थळे आणि चॅनल यांना देखील लाखो रूपयांच्या जाहिरातांची खैरात देण्यात आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी वृत्तसंस्थेने दैनिक गोमन्तकचे संपादक आणि संचालक राजू नायक यांचे मत जाणून घेतले. त्यावर, 'सरकारी जाहिराती म्हणजे सरकारला पाठिशी घालणे असा अर्थ होत नाही. जाहीरातीमुळे संस्थेची धोरणं किंवा सावंत सरकारबाबतच्या वृत्तांकनावर काही परिणाम होत नाही.' अशी प्रतिक्रिया राजू नायक यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com