
Rajasthan Assembly Election 2023 Pramod Sawant: देशातील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची धूम आहे. या सर्व राज्यांमध्ये भाजपच्या वतीने परिवर्तन यात्रा आयोजित केल्या जात आहेत.
या यात्रांमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हजेरी लावत असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे यात्रेत सहभागी झाल्यानंतर सावंत आता राजस्थान येथील यात्रेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत.
अलवर, राजस्थानमध्ये भाजपच्या परिवर्तन यात्रेचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. भिवडीत विश्रांती घेतल्यानंतर सकाळी ही यात्रा भिवडीहून बेहरोरकडे निघाली. कोटकसीम येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर्वसामान्यांना संबोधित करणार आहेत.
भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश मेहता यांनी एका हिंदी वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली. भाजपच्या परिवर्तन यात्रेचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे.
भाजपच्या परिवर्तन यात्रेला लोकांची झुंबड उडत आहे. काँग्रेस सरकारवर सर्वसामान्य जनता नाराज आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत भिवडी ते बेहरोर या प्रवासात सोबत असतील. बेहरोर येथे जाहीर सभा होणार आहे. यादरम्यान स्वागत सभांमध्ये नेत्यांची भाषणेही होतील. असे मेहता यांनी सांगितले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तिन्ही राज्याच्या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पक्षासाठी मेहनत घेताना दिसत आहेत. मुख्यमंत्री यापूर्वी सनातन धर्माचा मुद्दा घेऊन काँग्रेसवर सडकून टीका देखील केली. सावंत तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येईल असा दावा करताना देखील दिसत आहेत.
भाजपची परिवर्तन यात्रा जनसंपर्क वाढविण्याचे आणि पक्षाची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम ठरली आहे. त्यात मुख्यमंत्री सावंत सक्रियपणे सहभागी होताना दिसत आहेत. यात्रांना लोकांचा प्रतिसाद मिळत असला तरी त्याचा भाजपला किती फायदा होणार हे आगमी निवणुकीनंतरच स्पष्ट होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.