Chhattisgarh: 10 टक्के आश्वासनेही पूर्ण झाली नाहीत, छत्तीसगडमधून CM प्रमोद सावंत यांची काँग्रेसवर टीका

पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये डबल इंजिन सरकार निवडून देण्याची जनतेला आवाहन केले.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant In Chhattisgarh: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज (शनिवार, दि.16) रायपूर दौऱ्यावर आहेत. छत्तीसगडमध्ये सत्ता परिवर्तन होणार असल्याचा दावा केला आहे.

'छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप जनता करत आहे. भूपेश सरकारने आश्वासने पाळली नाहीत असा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये डबल इंजिन सरकार निवडून देण्याची जनतेला आवाहन केले.

छत्तीसगड राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भाजप परिवर्तन यात्रा काढत असून, दंतेवाडा येथून 12 सप्टेंबर आणि जशपूर येथून 15 सप्टेंबरला दोन टप्प्यात यात्रा सुरू झाली आहे.

भाजपची परिवर्तन यात्रा छत्तीसगडच्या 85 विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. या परिवर्तन यात्रेदरम्यान छत्तीसगड भाजपसह देशभरातील भाजप नेते छत्तीसगडला भेट देणार असून विविध रॅलींमध्ये सहभागी होणार आहेत.

काँग्रेसने राज्यात 5 वर्षात काय केले याचे रिपोर्ट कार्ड सादर करावे? 300 हून अधिक आश्वासने देण्यात आली, परंतु त्यापैकी 10 टक्केही पूर्ण झाली नाहीत. छत्तीसगडमध्ये सरकारने कोळसा घोटाळा, दारू घोटाळा केला. हे सरकार घोटाळ्यांचे सरकार असून, त्यांना घरी बसावा. असे प्रमोद सावंत म्हणाले.

काँग्रेसने दारूबंदीचे आश्वासन दिले होते, मात्र दारूबंदीऐवजी त्यांनी दारु होम डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली. छत्तीसगडमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, घर कधी मिळणार असा प्रश्न इथल्या लोकांना पडला आहे, प्रत्येकाला पंतप्रधान घर मिळायला हवे. असेही सावंत यावेळी म्हणाले.

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी छत्तीसगडमधील रायगडमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी छत्तीसगडमधील 6 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्धाटन केले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत शनिवारी रायपूरला पोहोचले. रायपूरमधील पत्रकार परिषदेनंतर ते डोंगरगावला येथे रवाना होतील. अर्जुनी येथे ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर सावंत राजनांदगावला जाणार आहेत. जिथे ते भाजपच्या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com