CM Pramod Sawant: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची जागतिक पातळीवर छाप; ठरले आशिया पॅसिफिकमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व

Goa CM Global Recognition: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता जागतिक पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant JCI Award: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता जागतिक पातळीवर आपल्या कार्याची मोहोर उमटवली. जेसीआय या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेने 'आशिया आणि पॅसिफिक 2025' साठीच्या आठ सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणून त्यांचा सन्मान केला आहे. ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल ( Junior Chamber International) कडून मिळालेला हा सन्मान मुख्यमंत्री सावंत यांचे प्रभावी नेतृत्व आणि सार्वजनिक सेवेसाठीची वचनबद्धता अधोरेखित करतो.

दरम्यान, या सन्मानामुळे मुख्यमंत्री सावंत यांना समाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या इतर उल्लेखनीय भारतीय नेत्यांच्या आणि व्यावसायिकांच्या पंक्तित स्थान मिळाले आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्याशिवाय गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अध्यक्ष जे.सी. कुमार गेरा, खासदार अनिल बोंडे, जे.सी. शाईन भास्करन, जे.सी. कवीन कुमार कुमारवेल, जे.सी. सुनील कुमार आरस, जे.सी. ए.एम.एस.जी. अशोकन, आणि जे.सी. रविशंकर यांनाही प्रभावशाली व्यक्ती म्हणून गौरवण्यात आले आहे.

Goa CM Pramod Sawant
CM Pramod Sawant: गोव्यात सुविधांसाठी 33 हजार कोटी खर्च! मुख्यमंत्र्यांनी सांगितले डबल इंजिनचे महत्व; पर्यटक वाढल्याचा दावा

मुख्यमंत्री सावंत यांचा जेसीआयसोबतचा प्रवास 2007 मध्ये जेसीआय उसगावचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सुरु झाला. नंतर त्यांनी जेसीआय साखळीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याला ते अजूनही मार्गदर्शन करतात. सामुदायिक विकासासाठीची त्यांची वचनबद्धता त्यांच्या स्वयंपूर्ण गोवा या उपक्रमातून दिसून येते. हा उपक्रम समग्र ग्रामीण विकास आणि स्वावलंबनावर लक्ष केंद्रित करतो. दुसरीकडे, कोरोना काळात मुख्यमंत्री सावंत यांनी गोमंतकीयांसाठी केलेल्या कामाची देखील प्रशंसा करण्यात आली.

Goa CM Pramod Sawant
Pramod Sawant: ‘शांतीप्रिय म्हणवणाऱ्या नेहरुंनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी 14 वर्षे विलंब केला’; CM प्रमोद सावंत

17-18 जुलै 2025 रोजी होणाऱ्या जेसीआय फिलीपिन्सच्या 110व्या वर्धापन दिन समारंभात मुख्यमंत्र्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर आणि जेसीआयचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com